Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सांगली जिल्ह्यात सोळा गावांना टँकरने पाणीपुरवठा

Tanker Water Supply : गतवर्षी जून महिन्यापर्यंत टंचाईची तीव्रता होती. त्यानंतर पावसाळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वच तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.

Team Agrowon

Sangli News : गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही यंदा एप्रिलच्या अखेरीस टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील १६ गावांना १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जत तालुक्यातील १५ आणि आटपाडी तालुक्यातील १ गावाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील लघू प्रकल्पातील पाणी साठ्यात घट झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात टंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी जून महिन्यापर्यंत टंचाईची तीव्रता होती. त्यानंतर पावसाळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वच तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्ह्यात तब्बल १६४ टक्के जादा पावसाची नोंद झाली. जतमध्ये १३० टक्के, खानापूरमध्ये १४० टक्के आणि कडेगांवमध्ये १४३ टक्के वगळता इतर तालुक्यात १७५ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ६४ टक्के जादा पावसाचे नोंद झाली. त्यामुळे टंचाईची तीव्रता जाणवणार नाही असा दावा पाटबंधारे विभागाने केला होता.

परंतु वाढत्या तापमानामुळे डिसेंबरपासूनच जिल्ह्यातील पाणी प्रकल्पातील साठा कमी होऊ लागला. जिल्ह्यात ८३ पाणी प्रकल्प आहेत. यात ७८ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठा गेल्या तीन महिन्यात झपाट्याने घटला आहे. त्यामुळे दुष्काळ तालुक्यात एप्रिलपासून पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता होतीच.

सध्या जत तालुक्यातील १५ आणि आटपाडी तालुक्यातील एक अशा १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंकलगी आणि उंबरगाव या दोन गावांना प्रत्येकी दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

त्यामुळे एकूण १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात ११९ वाड्यांचाही समावेश आहे. या गाव आणि वाड्यांमध्ये एकूण ४७२८७ लोकसंख्या पाण्यासाठी तहानलेली आहे. तर २९७०९ पशुधनही बाधित आहे.

सोळा गावांना टँकरने पाणी

जत तालुक्यातील सिंदूर, बसर्गी, करेवाडी, अंकलगी (२), मुचंडी, उमराणी, काराजनगी, साळमळगेवाडी, गिरगाव, तिल्ल्याळ, एकुंडी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, संख, सोनलगी.आटपाडी तालुक्यातील उंबरगाव (२)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT