Shamsundar Sonnar Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Unity : शेतकऱ्यांची एकजूट ही कोणताही लढा जिंकू शकते

Team Agrowon

Beed News : शेतकऱ्यांची एकजूट ही कोणताही लढा जिंकू शकते. मात्र शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये म्हणून त्यांना जातीय संघर्षात अडकवले जात आहे. त्यांच्या धार्मिक अस्मिता टोकदार केल्या जात आहेत. आपले हक्क मिळवायचे असतील तर शेतकऱ्यांनी जात-धर्म विसरून एक व्हावे, असे आवाहन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने बीड जिल्ह्यातील तेलगाव येथील संकटमोचन हनुमान मंदिरात धरणे आंदोलन सुरू आहे. रविवारी (ता. ६) या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. या ठिकाणी शामसुंदर महाराज यांनी कीर्तनातून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. ते म्हणाले, की ज्याची कुणी मागणी केली नाही अशा योजनांवर सरकार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत आहे.

मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. जाहीर केलेले अनुदान, पीकविम्याचे पैसे वेळेवर आणि शेतकऱ्यांनी मागणी करूनही मिळत नाहीत. कारण शेतकऱ्यांची एकजूट नाही. खरेतर शेतीवर उपजीविका करणारा मोठा वर्ग देशात आहे. मात्र तो एकत्र येऊ नये म्हणून त्यांत फूट पाडली जात आहे.

धर्माच्या अस्मिता टोकदार करून धार्मिक विद्वेष वाढविला जात आहे. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रश्नाची जाणीव होत नाही. आता तरी शेतकऱ्यांनी सावध व्हावे. जात-धर्माच्या चौकटीतून बाहेर येऊन शेतकरी म्हणून एक व्हावे, तरच आपल्याला न्याय मिळेल, असेही शामसुंदर महाराज म्हणाले.

किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे म्हणाले, ‘‘आम्ही नवीन काही मागत नाही, सरकारनेच जे जाहीर केले आहे ते वेळेत द्यावे यासाठी हे आंदोलन आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार दत्ता डाके, भगवान बडे, विठ्ठल लगड यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी न्यायाधीश बाबूराव तिडके, सुभाष डाके, विष्णू देशमुख, सुदाम शिंदे, सय्यद रजक आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Rate : कापसाचे दर वाढण्याची चिन्हे?

Indian Politics : निकालांनंतरचा सत्तासंघर्ष

Soybean Farmers : कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा, कोल्हापूर बाजार समितीकडून इशारा

Bhuibawda Ghat : भुईबावडा घाटरस्ता रविवारपर्यंत बंदच, फोंडाघाट मार्गे वाहतूक

Kolhapur Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो, गवार, रताळ, बटाटा भाव वाढले, कोथिंबीर मात्र कवडीमोल भावात

SCROLL FOR NEXT