Ramdas Athavale Agrowon
ॲग्रो विशेष

Ramdas Athavale : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध केंद्रीय मंत्री रामदास आठवले ः कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे किसान सन्मान समारंभ

Kisan Samman Samarabh : सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय देणे, शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी केंद्र सरकार प्राथमिकता देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार कायम कटिबद्ध आहे,

Team Agrowon

Solapur News : सोलापूर : सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय देणे, शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी केंद्र सरकार प्राथमिकता देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार कायम कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे आयोजित किसान सन्मान समारोह कार्यक्रमामध्ये मंत्री आठवले बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे उपस्थित होते.

मंत्री आठवले म्हणाले, ‘‘कृषी विज्ञान केंद्राचे काम कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी माहिती इथे दिले जात आहे. तांत्रिक मार्गदर्शन होत आहे. सध्या शेतीमध्ये खर्च कमी करणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे, यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरावी लागेल.’’

प्रास्ताविकात डॉ. तांबडे यांनी किसान सन्मान निधी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदीप गोंजारी यांनी केले.

शेतकऱ्यांचे अनुभव कथन
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी डाळिंब लागवडीविषयी सविस्तर माहिती दिली. नैसर्गिक शेती व सेंद्रिय निविष्ठांचा वापर याविषयी सेंद्रिय शेती करणारे शेतकरी उमेश देशमुख आणि अजित ओक यांनी आपले अनुभव कथन केले.

मंत्र्यांनी हुरडा, अंजिराची चाखली चव
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या वेळी मान्यवरांसह कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या माजी प्रशिक्षणार्थीनी उत्पादित केलेले सेंद्रिय अंजीर, हुरडा, श्रीखंड, जात्यावर केलेली तुरदाळ तसेच ज्वारीचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, नाचणीची बिस्किटे इत्यादींची पाहणी केली. याबरोबरच महिला शेतकरी उत्पादक कंपनी बोरामणी तसेच सेंद्रिय नुट्रीशनल मॉल याबद्दल मंत्री आठवले यांनी माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT