Monsoon 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2025: महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी कमी पाऊस; मुंबई, रायगड, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अपुरा पाऊस झाला आहे. कोकण, पुणे, सातारा जिल्ह्यांत धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. यवतमाळसह काही भागांत पेरण्या लांबल्या आहेत. मुंबई, रायगड व रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे.

Sainath Jadhav

Pune News: महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस काही भागांत जोर धरत असला, तरी इतर ठिकाणी अपुरा पडल्याने पर्जन्यमानात तफावत दिसून येत आहे. कोकण, पुणे, सातारा भागात मुसळधार पावसाने धरणांमध्ये पाणीसाठा वाढला, यवतमाळसह इतर काही जिल्ह्यांमध्ये पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनानंतर पावसाचा खेळ सुरू आहे. कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला असताना, यवतमाळसारख्या विदर्भातील भागात मात्र कमी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

यवतमाळात १७ जूनपर्यंत ९२.९ मिमी पाऊस अपेक्षित होता, पण केवळ ३४.८ मिमी पाऊस झाला, म्हणजेच ३७ टक्केच पाऊस पडला. गेल्या वर्षी याच कालावधीत ५१ टक्के पाऊस झाला होता. यामुळे पेरणी लांबणीवर पडली असून, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

दुसरीकडे, सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत १३३ ते १५८ मिमी पाऊस पडला, ज्यामुळे धरणात २.४ टीएमसी पाण्याची भर पडली. धरणातील पाणीसाठा आता २८.१० टीएमसी (२६.७ टक्के) झाला आहे. पुण्यातही खडकवासला धरणातून २,००० क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे, तर इंद्रायणी नदीची पातळी वाढल्याने आळंदीतील मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे.

लोणावळ्यात २२१ मिमी पावसाची नोंद झाली असून, भुशी धरण ओसंडून वाहत आहे. मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.राज्यातील धरणांमध्ये ३२.५५ टक्के (४६५.६३ टीएमसी) पाणीसाठा आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. कोकणात ३६.१८ टक्के, तर अमरावतीत ३९.१८ टक्के पाणीसाठा आहे.

सांगलीत अलमट्टी धरणातून ७०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गातही पावसाचा जोर वाढला आहे.सातारा जिल्ह्यात मे महिन्यातील अवकाळी पावसाने शेती, घरे आणि पशुधनाचे नुकसान झाले होते.

आता १५ कोटींची नुकसानभरपाई वाटप सुरू झाले आहे, ज्यामध्ये ४,४३४ हेक्टर शेतीच्या नुकसानीसाठी १२.३८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. नवीन दरांनुसार ही रक्कम वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : मूग, उडीद, तुरीच्या पेरण क्षेत्रात घट

Costal Safety : काशीदला ‘बंधाऱ्या’चे सुरक्षा कवच

Pune Dams: पुणे जिल्ह्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा

Dhamani Dam : धामणी धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा

Loan Waiver Promise: अजितदादांच्या सासुरवाडीतूनच कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT