Maharashtra Agriculture News agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Agriculture News : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत, राज्य सरकारचा धान्य खरेदी करण्याचा निर्णय

MSP Scheme : केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भात (धान) व ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्याच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या.

sandeep Shirguppe

Agriculture News : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या पणन हंगामात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भात, भरड धान्य खरेदी केली जाणार असल्याची माहिती दिली.

केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भात (धान) व ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्याच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या. यावेळी आधारभूत किमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार राज्यात खरेदी केंद्र सुरू करून त्या ठिकाणी धानाची व ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरड धान्याची खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

या दराने करणार खरेदी

या योजनेंतर्गत भात सर्वसाधारण (एफएक्यू) २ हजार १८३ रुपये, अ दर्जा २ हजार २०३ रुपये, ज्वारी (संकरित) ३ हजार १८०, ज्वारी (मालदांडी) ३ हजार २२५, बाजरी २ हजार ५००, मका २ हजार ०९०, रागी ३ हजार ८४६ रुपये याप्रमाणे आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यात येणार आहे.

खरीप पणन हंगामात धान ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत खरेदी कालावधी असणार आहे, तर भरडधान्य १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत खरेदीचा कालावधी असणार आहे.

याशिवाय आधारभूत किमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान विकावे लागू नये यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा या हेतूने राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता व त्या ठिकाणी धानाची व ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्याची खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्यामध्ये केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ (food corporation of India) काम पाहणार आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या समन्वयाने राज्य शासन कार्यवाही करणार असून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक हे राज्य शासनाचे मुख्य अभिकर्ता म्हणून या योजनेचे काम पाहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT