Ujani Dam Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam Water Storage : ‘उजनी’तील पाणीसाठा उणे १५ टक्क्यांवर ; शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष

Water Shortage : उजनी धरण सध्या उणे १५ टक्क्यांवर आले असून, धरणात सध्या ५५.७९ टीएमसी पाणी आहे. धरण उणे २५ टक्क्यांवर पोहोचल्यावर कालव्यातून पाणी सोडता येत नाही.

Team Agrowon

Soplapur News : सोलापूर : उजनी धरण सध्या उणे १५ टक्क्यांवर आले असून, धरणात सध्या ५५.७९ टीएमसी पाणी आहे. धरण उणे २५ टक्क्यांवर पोहोचल्यावर कालव्यातून पाणी सोडता येत नाही. त्यामुळे सध्या शेतीसाठी सोडलेले आवर्तन यंदाच्या हंगामातील शेवटचे असणार आहे. २५ मेपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार आहे.

शेतीसाठी कालव्यातून ‘टेल टू हेड’ पाणी सोडण्यात आले आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या आवर्तनाचे पाणी तीन-चार दिवसांतच बंद करून पुढील कालव्याला सोडले जात आहे. उजनीच्या पाण्यावर पिके केलेल्या शेतकऱ्यांनी आणखी काही दिवस पाणी सुरू राहण्याचा आग्रह धरला आहे. त्यासाठी रात्री १० नंतर अचानक पाणी बंद केले जात आहे.

धरणात जरी ५५ टीएमसीवर पाणी असले तरी आणखी पाच टीएमसी पाणी कमी झाल्यावर कालव्यातून शेतीसाठी पुरेशा वेगाने पाणी जात नाही. त्यामुळे आता अधिकारी घाईघाईत पाणी कमी कमी करीत ‘हेड’कडे जात आहेत. आगामी काळात मेअखेर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागणार आहे. त्यानंतर धरणातील उर्वरित पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत पिण्यासाठी वापरावे लागणार आहे.

सध्या जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांची कामे सुरू असून, आगामी वर्षात ही कामे पूर्ण झाल्यावर धरणातील पाणी कालव्यातून शेतीसाठी सोडताना अधिकाऱ्यांना तारेवरील कसरत करावी लागणार आहे. सध्या लघू व मध्यम प्रकल्पातील पाणी देखील पिण्यासाठीच राखून ठेवले जात आहे.

नदी अन्‌ ‘उपसा सिंचन’चे पाणी बंद
भीमा नदीतून सोडलेले पाणी बंद करण्यात आले असून, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनांचे पाणी आता बंद करण्यात आले आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने बाष्पीभवन देखील वाढले आहे. अवकाळीमुळे पावसाळा लांबणीवर पडेल, असा अंदाज असल्याने कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग देखील कमी करून आता २८७० क्यूसेक करण्यात आला आहे.

उजनीतील सध्याचा पाणीसाठा
एकूण पाणीसाठा

५५.७९ टीएमसी
 उपयुक्त पाणीसाठा
उणे ७.४१ टीएमसी
 पाण्याची टक्केवारी
उणे १५ टक्के
 धरणातून सोडलेला विसर्ग
३२७० क्यूसेक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT