Uddhav Thackeray  Agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray : शेतकरी संकटात, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रचारात ; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Uddhav thackeray Criticizes : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारासाठी गेल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली.

Swapnil Shinde

Uddhav Thackeray On Eknath shinde : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे तेलंगणातील निवडणूकीत भाजपचा प्रचार करत आहेत. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार राज्यात रविवारपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना सरकार जागेवर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तेलंगणामध्ये निवडणुकीत प्रचार करतायत. ते स्वत:च घर सोडून दुसऱ्याच्या दारोदारी का फिरताय. तिथल्या लोकांना थापांचे धूर न सोडला. महाराष्ट्रात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, अशी मागणी ठाकरेंनी केली.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही सडकून टीका केली. दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा देण्याची घोषणा कृषिमंत्री कुठे आहेत?, तुमचं शेतकऱ्यांना कधी दर्शन दाखवणार, असा सवाल केला. शेतकरी अडचणीत सरकारने शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे. त्यांना मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण पंचतारांकित शेतकरी भाजपचा प्रचार करत फिरत आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार नव्हते, अशी जहरी टीका शिंदेंवर केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT