Prahar Shetkari Sanghatana Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : पालखेडला दोन आवर्तने द्या; अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करू

Prahar Farmers' Association demand : रब्बी पिकांसाठी दोन आवर्तन सोडावेत, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करू अशी मागणी येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेने केली

Team Agrowon

Nashik News : पालखेड कालवा निर्मिती येवला तालुका कायम दुष्काळी म्हणून झाली आहे. तर यंदा तालुक्यात पुरेशा पावसाअभावी खरीप पूर्णपणे हातचा गेला आहे. अशा परिस्थितीत पालखेड धरण समूहातील सर्वच धरणे १०० भरलेली असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी रब्बी पिकांसाठी १५ नोहेंबरपासून दोन आवर्तने सोडण्यात यावी,

अशी मागणी येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेने केली. पाणी न सोडल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पालखेड कालव्याच्या पाण्यासाठी ‘प्रहार’ पुन्हा आक्रमक झाली आहे.

येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता पालखेड डावा कालवा विभाग यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले आहे.

मध्यंतरी पडलेल्या अल्प पावसावर परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे. मात्र सध्या विहिरी कोरड्या असल्याने पाणी लवकर सोडल्यास कांदा पीक हातात येऊन शेतकऱ्याच्या हाती दोन पैसे मिळतील. पूर्वानुभव बघता नुसता तालुका दुष्काळी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही. मात्र दोन आवर्तने दिल्यास बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दिलासा भेटेल असे सांगण्यात आले आहे.

वास्तविक करंजवन, पालखेड धरणांतील १ नोहेंबर रोजीचा पाणीसाठा ५,६५० दशलक्ष घनफूट व वाघाड धरणातील ४० टक्के पकडून तिन्ही धरणांतील जलसाठा ६,८५० दशलक्ष घनफूट उपलब्ध असल्याने पाहिल्या ३० दिवसांच्या अवर्तनासाठी १,८०० दशलक्ष घनफुट व दुसऱ्या २५ दिवसांच्या अवर्तनासाठी १,४०० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज लागणार आहे.

उपलब्ध पाणीसाठ्यात प्रासंगिक आरक्षण वजा जाता हे सहज शक्य असल्याने येवला तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रब्बीचे १५ नोहेंबर ते १५ डिसेंबर पाहिले, तर १ जानेवारी ते २५ जानेवारी दुसरे आवर्तन देण्याची मागणी केली आहे. या वेळी तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, संघटक किरण चरमळ, उपाध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे, शिवाजी खापरे, विलास उराडे, अशोक खापरे, दीपक सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT