Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : कापसाच्या दोन लाख गाठींची दररोज आवक

Cotton Update : देशात सध्या दररोज दोन लाख कापूस गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) म्हणजेच १० ते साडेदहा लाख क्विंटल कापसाची आवक होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : देशात सध्या दररोज दोन लाख कापूस गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) म्हणजेच १० ते साडेदहा लाख क्विंटल कापसाची आवक होत आहे. ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत दुप्पट आहे. आवक अधिक असल्याने दरात सुधारणा दिसत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

मागील वर्षी देशात रोज एक लाख गाठींच्या कापसाची रोज आवक होत होती. यंदा मात्र ही आवक दुप्पट आहे. आवक अधिक असल्याने दरात फारशी वाढही दिसत नसल्याचे चित्र आहे. राज्यात ५० ते ५५ हजार कापूस गाठींच्या कापसाची आवक होत आहे. ही आवकदेखील बऱ्यापैकी आहे. कापसाचे दर राज्यात किंवा देशात वेगवेगळे आहेत.

एका खंडीचे दर (३५६ किलो रुई) ५४ हजार ते ५४ हजार ५०० रुपये असे आहेत. खंडीच्या दरातही मागील सात ते आठ दिवसांत काहीशी घसरण झाल्याची माहिती मिळाली. सध्या देशात गुजरात, तेलंगण व महाराष्ट्रात कापसाची सर्वाधिक आवक होत आहे. खानदेश व मराठवाड्यात मिळून रोज मोठी कापसाची आवक होत आहे.

सरकीचे दर २७०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तर दर मागील वर्षी जानेवारीत सरकीचे दर ३२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. यंदाच्या हंगामात ऑक्टोबरमध्ये सरकीचे दर ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विटल, असे होते. परंतु सरकीच्या दरात सतत घट झाली आहे. सोयाबीनचे दरही ४८०० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

त्यात घसरण झाली असून, सोयाबीन दर ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. यामुळे सरकी तेल, सरकी ढेपला याला उठाव कमी असून, सरकी दरांवर दबाव वाढत असल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांकडील साठा ३५ ते ४० टक्के

सध्या देशात एकूण १६० ते १६५ लाख कापूस गाठींच्या कापसाची आवक झाली आहे. अर्थात, शेतकऱ्यांकडे ३५ ते ४० टक्के कापूस अद्याप साठविलेला आहे, असा दावा बाजारातील जाणकार करीत आहेत. परंतु यंदा कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी ८० किलो ते एक क्विंटल एवढेच आले.

महाराष्ट्र, तेलंगणात उत्पादनात मोठी घट झाली असून, देशात एकूण २८० लाख गाठींचे उत्पादनही शक्य नाही, असेही सांगितले जात आहे. यामुळे आता शेतकऱ्यांकडील साठा फारसा शिल्लक नाही, असाही कयास लावला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT