Sugarcane Harvesting Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : चोवीस लाख टनांवर ऊस गाळपाचा अंदाज

Sugarcane Crushing : यंदाचे गाळप २४ लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. कारखान्यांनीही गाळपाची तयारी केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ऊस गाळप यंदाही ऑक्टोबरअखेरीस वेगात सुरू होणार आहे. यंदाचे गाळप २४ लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. कारखान्यांनीही गाळपाची तयारी केली आहे.

ऊस गाळपात नंदुरबारने मागील वेळेस आघाडी घेतली होती. नंदुरबारातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने प्रतिदिन साडेनऊ हजार टन ऊसगाळप केले होते. नंदुरबारमध्ये तीन साखर कारखाने सुरू होते.

धुळ्यात एक लहान कारखाना सुरू होता. तेथे रोज ६०० ते ७०० टन उसाचे गाळप केले जात होते. जळगाव जिल्ह्यातही दोन कारखाने सुरू होते. यंदाही नंदुरबारमध्ये तीन, धुळ्यात एक व जळगावात दोन कारखाने सुरू होतील.

जळगावातील दोन्ही कारखाने खासगी व्यवस्थापनाचे आहेत. जळगाव जिल्ह्यात चहार्डी (ता. चोपडा), घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) येथील कारखाने सुरू होतील. नंदुरबारातील कारखान्यांकडून अधिकचे गाळप दरवर्षी केले जाते.

अन्य भागांतूनही वाहतूक

खानदेशात नाशिक, छत्रपती संभाजीनगर व नगर जिल्ह्यातील कारखानेदेखील उसतोडणी करतात. धुळ्यातील साक्री, जळगावमधील चाळीसगाव, चोपडा भागांत अन्य जिल्ह्यांतील कारखाने येऊन ऊसतोडणी करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT