Spices Agrowon
ॲग्रो विशेष

Spice Crop Value Addition : मसाला पिकांच्या मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा

Spices Crop Processing : हळद, आले, मिरची या मसाला वर्गीय पिकांच्या मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल. त्यादृष्टीने निर्यातक्षम उत्पादन, प्रक्रिया उद्योग उभारणीस चालना द्यावी लागेल.

Team Agrowon

Parbhani News : हळद, आले, मिरची या मसाला वर्गीय पिकांच्या मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल. त्यादृष्टीने निर्यातक्षम उत्पादन, प्रक्रिया उद्योग उभारणीस चालना द्यावी लागेल. त्याअनुषंगाने आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागेल.

शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, कृषी विद्यापीठ यांना सोबत काम करावे लागेल, असा सूर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागातर्फे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शुक्रवारी (ता. ११) आयोजित मसाला पिके व्यवस्थापन व मूल्यवर्धन यावरील विशेष प्रशिक्षणात उमटला.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा अध्यक्षस्थानी होती. सातेफळ (ता. वसमत) येथील सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालकडॉ. राकेश अहिरे, प्रमुख संशोधक डॉ. विश्‍वनाथ खंदारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ.जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, अनिल ओळंबे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. आंनंद दौंडे, डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. सचिन मोरे, डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. आशा सातपुते, डॉ. एस. आर. बरकुले, डॉ. ए. एम. भोसले, डॉ. एस. जे. सय्यद, डॉ. पंकज जावळे निकिता दापूरकर आदी उपस्थित होते.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. आता प्रक्रिया, मूल्यवर्धनाचे तंत्रज्ञान पोहोचावे लागेल. शेतीमालावर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग मराठवाड्यात आले पाहिजेत. मांडाखळी, मुरुंबा, माखणी, मिरखेल, शेंद्रा, रेगाव, धोत्रा, आडगाव (रंजेबुवा)आदी गावांतील शेतकरी, महिला सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Production Policy: चारा उत्पादन धोरण राबवविणार: राधाकृष्ण विखे पाटील

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू

NAFED Kharedi: नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत

Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी ‘हाहाकार मोर्चा’

Fake Seeds: बियाणे, खते, कीटकनाशकांचे ११८ नमुने अप्रमाणित

SCROLL FOR NEXT