Tur Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Tur Procurement : हमीभावाने ४० हजार ९०१ क्विंटल तूर खरेदी

Tur Market : पणन महासंघाअंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १६ केंद्रांवर २ हजार ३४८ शेतकऱ्यांची ४० हजार ९०१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

Team Agrowon

Parbhani News : किंमत आधार योजना (प्राईस सपोर्ट स्कीम-पीएसएस) २०२४-२५ अंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ७५५० रुपये) तूर खरेदीची मुदत २८ मे ला संपली आहे. पणन महासंघाअंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १६ केंद्रांवर २ हजार ३४८ शेतकऱ्यांची ४० हजार ९०१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

आजवर या दोन जिल्ह्यांतील १ हजार २५ शेतकऱ्यांना १९ हजार २९७ क्विंटल तुरीचे १४ कोटी ५६ लाख ९२ हजार ३५५० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

केंद्रीय नोडल एजन्सी ‘नाफेड’च्या (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) वतीने हमीभावाने तूर खरेदीकरिता राज्य सहकरी पणन महासंघाअंतर्गत परभणी जिल्ह्यात परभणी, पेडगाव, झरी, वरपुड, जिंतूर, बोरी, भोगाव, सेलू, मानवत, रुढीपाटी, पाथरी, देवनांदरा, सोनपेठ, पालम, चाटोरी, पूर्णा, एरंडेश्वर, ताडकळस या १८ केंद्रांवर १ हजार ९८८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.

नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले. २८ मेपर्यंत पेडगाव, बोरी, भोगाव, सेलू, रुढी पाटी, देवनांद्रा, एरंडेश्वर, ताडकळस या ८ केंद्रांवर १ हजार ७१ शेतकऱ्यांची १७ हजार ३८० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत १२ कोटी ५१ लाख २२ हजार ३७५ रुपये होती.

केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) वतीने तूर खरेदीकरिता राज्य सहकारी पणन महासंघाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा, पुसेगाव या १५ केंद्रांवर २ हजार ७९४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.

सर्व शेतकऱ्यांना तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले. २८ मे पर्यंत हिंगोली, कनेरगाव, फाळेगाव, कळमनुरी, सेनगाव, नागसिनगी, जवळा बाजार, आडगाव या ८ केंद्रांवर १ हजार २७७ शेतकऱ्यांची २३ जार ५२१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

या तुरीची किंमत १७ कोटी ७५ लाख ८७ हजार ३२५ रुपये होती. परभणी जिल्ह्यात एकूण १४ हजार ३९३ क्विंटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT