Tur Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Crop Damage : जळगाव जामोदमध्ये तुरीचे पीक जमिनीवर

Unseasonal Rain Crop Damage : तुरीचे पिक जमिनीवर आडवे झाले असून त्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या पाऊस, वादळामुळे अंतिम टप्प्यात आलेले खरीप तुरीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. तुरीचे पिक जमिनीवर आडवे झाले असून त्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तालुक्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी पिकामध्ये आंतरपीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. सोयाबीन काढल्यानंतर तुरीचे पीक हे शेतात उभे होते.

तालुक्यामध्ये ११ हजार ८८९ हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. तर, २१ हजार २६ हेक्‍टरवर कपाशी आहे. या दोन्ही पिकांमध्ये तूर हे आंतरपीक आहे. काही शेतांमध्ये तुरीच्या पिकाला फुलोर आलेला आहे. फुलोरामुळे पीक बहरले आहे. तर काही ठिकाणी शेंगासुद्धा धरल्या आहेत.

पावसामुळे तुरीच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे कपाशी, भाजीपाला आणि कांद्याच्या रोपाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सीताफळ पिकाची सुद्धा फळ गळती झाली आहे. त्यामुळे सर्व नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची सर्वच स्तरातून मागणी होत आहे.

शेतकऱ्याला दुसऱ्यांदा फटका

यापूर्वी २२ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्याच्या पिकांचे बरेच नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. त्याची सुद्धा कसलीही मदत शेतकऱ्याला अद्यापपर्यंत मिळाली नाही. तुरीचे पीक येत्या काही दिवसात घरात येणार होते.

अंतिम टप्प्यात आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. तालुक्यामध्ये १२ ते १३ हजार हेक्टरवर तुरीचे पीक घेतले जाते. पीक अंतिम टप्प्यात असताना तुरीच्या पिकाचा कीटकनाशके फवारणी खर्च हा किमान हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्याने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT