Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : तुपकर ‘सीमोल्लंघना’च्या तयारीत?

Politics Update : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाजूला केल्यानंतर ते ताकदीने लोकसभा लढले व त्यांनी बुलडाण्यातून अपक्ष कडवी झुंज दिली.

Team Agrowon

Buldana News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाजूला केल्यानंतर ते ताकदीने लोकसभा लढले व त्यांनी बुलडाण्यातून अपक्ष कडवी झुंज दिली. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते जोरदार तयारीला लागले आहेत.

या आठवड्यातील राजकीय घडामोडी पाहता त्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा वेगळ्या राजकारणाची चाहूल दर्शवीत आहे. मात्र या भेटीमुळे रविकांत तुपकर ‘सीमोल्लंघन’ करणार की चळवळीचे अस्तित्व कायम ठेवून स्वतंत्र राहणार, अशा पद्धतीचे तर्कवितर्कही मांडल्या जाऊ लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीत बुलडाणा लोकसभा मतदार संघात स्वतंत्रपणे लढत देत रविकांत तुपकरांनी सुमारे अडीच लाखांपर्यंत मते मिळवली होती. या मतांमुळे राज्याचे लक्ष त्यांनी वेधले. आता विधानसभा निवडणूक अधिक गंभीरपणे घेत ते व त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत. लोकसभेनंतर लगेच त्यांची विधानसभेची तयारी सुरू झाली होती. प्रत्येक मतदार संघात त्यांनी लक्ष केंद्रित केले. शिवाय राज्यातही सुमारे २५ पेक्षा अधिक मतदार संघात उमेदवार देण्याची तयारी ठेवली आहे.

याच दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुपकरांना भेटीचे निमंत्रण दिले होते, त्या निमंत्रणावरून तुपकर व उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त बाहेर आले आहे. या भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे बाहेर येऊ शकलेले नाही. मध्यंतरी राज्यात तयार झालेल्या तिसऱ्या आघाडीतूनही तुपकरांना निमंत्रण मिळालेले होते. मात्र त्यांनी तो मार्ग निवडला नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर ही त्यांना सोबत घेण्यास इच्छुक आहेत. परंतु तुपकरांनी त्याबाबतीत भूमिका अजून स्पष्ट केली नाही. गेली काही दिवस ते स्वतः ज्या पद्धतीने राज्यात दौरे करून विधानसभेसाठी तयारी करीत आहेत, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, हे बघता स्वतंत्र लढण्याची तयारी दिसून येते.

तुपकरांना मानणारा मोठा वर्ग...

बुलडाणा जिल्ह्यात तुपकरांची एक मोठी व्होट बँक आहे. तसेच राज्यातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचप्रमाणे शेतकरी व तरुणांमध्ये त्यांची क्रेज आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो, या हेतूने तुपकरांना सोबत घेण्याचा विचार अनेकांनी व्यक्त केलेला आहे. तुपकर सोबत आले तर त्यांना एका मतदार संघात उमेदवारी देणे आणि उर्वरित ठिकाणी त्यांची मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळवणे हा शुद्ध हेतू लपून राहिलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT