Vegetable Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Cultivation : विक्रमगडमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल

Agriculture News : भात, नाचणी ही मुख्य पिके पावसाच्या भरवश्यावर घेणारा शेतकरी आता थोडासा सजग झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे फटका बसून शेतकरी नेहमीच अडचणीत येत असतो.

Team Agrowon

Vikramgad News : तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांतील शेतकरी आता हळूहळू पैसा देणाऱ्या भाजीपाला पिकाकडे वळू लागला आहे. पारंपरिक भातशेतीला थोडे दूर सारत पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी किमान हिवाळी हंगामात भाजीपाला लागवड केली जात आहे. सध्या शेतकरी भाजीपाला लागवडीत गर्क झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

भात, नाचणी ही मुख्य पिके पावसाच्या भरवश्यावर घेणारा शेतकरी आता थोडासा सजग झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे फटका बसून शेतकरी नेहमीच अडचणीत येत असतो. त्यावर उपाय म्हणून भाजीपाला पीक लागवडीकडे कल दिसून येत आहे.

पावसाळ्यात पेरणी, भाताची लावणी व अन्य मशागतीची कामे करून भातकापणी आटोपली की पुन्हा त्यांचे डोळे खरीप हंगामाकडे लागलेले असायचे. मात्र, अलीकडच्या काळात शेतकरी आधुनिकतेच्या जगात वावरू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी हिवाळी हंगामात भाजीपाला उत्पन्न घेण्यास सुरू केले आहे.

मोकळ्या किंवा थोड्या अधिक जमिनीत माठ, भोपळा, मिरची, वांगी, चवळी, काकडी, भेंडी, कोथिंबीर, मेथी, मुळा, आदी विविध भाजीपाला पीक लागवड केली जात आहे. अशा पालेभाज्या, भाजीपाला मळ्यावर मजुरी करणारे स्त्री-पुरुष मजूरही अर्थाजनाचा चांगला लाभ घेऊ लागले आहेत. दुसरीकडे तयार झालेल्या ताज्या भाजी शहरापर्यंत पोहचवण्याचा मानस शेतकऱ्यांचा आहे. स्थानिक भाज्यांना मागणीही चांगली वाढते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

सध्या थंडीचा मोसम असल्याने याच काळात भाजीपाला लागवड केली जाते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भाजीपाला तयार होऊन विक्रीयोग्य होत असतो. भाजीपाल्याला योग्य वेळी पाणी देणे गरजेचे असते. येथे सोय असल्याने आम्ही दरवर्षी भाजीपाला लागवड करतो.- विलास पाडवी, शेतकरी, विक्रमगड

पाण्याच्या अभावामुळे काही वेळेस भाजीपाला पिकावर परिणाम होतो. पीक विक्रीसाठी बाहेरील दलाल येत असतात. ते शेतकऱ्यांना खूप कमी भाव देतात.
- विजय सांबरे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT