Wild Animal Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Rampage : वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी चरी

Forest Department : चांदोली अभयारण्यामधून गवे व इतर वन्य प्राणी चाऱ्याच्‍या टंचाईमुळे जंगलाबाहेर पडल्यामुळे अनेक गावांत शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Team Agrowon

Sangli News : वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वन्य विभागामार्फत चर खोदण्याच्‍या कामास सुरुवात झाली असून, या कामामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले.

बेलेवाडी, उपवळे (ता. शिराळा) येथे वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वन्य विभाग हद्दीलगत चर खोदण्याचे काम सुरू असून, त्या कामाची पाहणी नाईक यांनी ग्रामस्थांसमवेत केली. रिळेचे सरपंच बाजीराव सपकाळ, वनपाल अनिल वाजे, बेलेवाडीचे सरपंच बजरंग जाधव व उपवळे सरपंच संभाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाईक म्हणाले, ‘‘चांदोली अभयारण्यामधून गवे व इतर वन्य प्राणी चाऱ्याच्‍या टंचाईमुळे जंगलाबाहेर पडल्यामुळे अनेक गावांत शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक ठिकाणी दोन-दोनशे एकर जमिनीचे क्षेत्र पडून राहिले आहे.नागरी वस्तीत वन्य प्राण्यांचे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. हा उपद्रव रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक वेळा मोर्चे व ठिय्या आंदोलन झाले.

गतवर्षी शिराळा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित विभागाकडून ठोस लेखी आश्वासन घेण्यात आले. तहसीलदारांच्या दालनात अधिकारी व आंदोलक शेतकरी यांच्यात बैठक झाली. पाठपुरावा करून प्रादेशिक वनविभागाने सरहद्दीने संरक्षण कुंपणाचा प्रस्ताव सादर करण्यात येईल.

अंदाजपत्रक जास्त रकमेचे झाले, वेळ लागत असेल तर प्राथमिक स्वरूपात चर मारून वन्य प्राणी खासगी क्षेत्रात येऊन नुकसान करत आहेत त्याचा बंदोबस्त करण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यानुसार बेलेवाडी, रिळे, उपवळे, तडवळे येथे प्रत्येकी ३.२५ किलोमीटर अंतराची ३ मीटर रुंद व २ मीटर खोल चर मारण्याचे काम सुरू झाले आहे. शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान थांबून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT