Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : कृषी विभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम

Transfers In Agriculture Department : कृषी विभागात कृषी सहायक, पर्यवेक्षकांसह कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.

Team Agrowon

Amaravati News : कृषी विभागात कृषी सहायक, पर्यवेक्षकांसह कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेतील समिती समुपदेशनात व्यस्त झाली आहे. बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात येणार आहे.

अमरावती जिल्ह्यात कृषी सहायक व सेवकांची संख्या ३७५ इतकी असून त्यांचे सध्या कामबंद आंदोलन सुरू आहे. यातील सहा वर्षे एकाच ठिकाणी सेवा झालेल्या सहायकांना बदलीसाठी पात्र ठरविण्यात येत आहे. बदलीसाठी असलेल्या निकषात जिल्ह्यातील ६१ कृषी सहायक पात्र ठरले असून त्यांचे समुपदेशन सध्या सुरू आहे.

यासोबतच कृषी पर्यवेक्षक, कनिष्ठ लिपिक व वरिष्ठ लिपिकांचेही स्थानांतर करण्यात येत आहे. विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशाने स्थानांतर करण्यात येणार असून त्यापूर्वी बदलीस पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेतील समिती समुपदेशन करीत असून बदलीस पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. अमरावती जिल्हा कृषी कार्यालयांतर्गत जवळपास २५० च्या वर कर्मचाऱ्यांचे स्थानांतर होणार आहे.

बदली होऊ नये, यासाठी धावाधाव

एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना अन्यत्र स्थानांतर नको आहे. त्यांनी या यादीत आपले नाव येऊ नये, यासाठी धावाधाव सुरू केली आहे. समुपदेशनात अनेक कारणे सांगून बदली होणार नाही, असेही प्रयत्न सुरू आहेत. काहींनी त्यासाठी राजकीय लागेबांधेही वापरण्यास सुरवात केली आहे. तथापि कर्मचाऱ्यांना मत मांडण्याची संधी देत स्थानांतर करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT