Farmers Training  Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : नैसर्गिक शेती गट सदस्यांचे वाशीममध्ये प्रशिक्षण

Farmers Training : पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नैसर्गिक शेती गटांचे दोन दिवसीय प्रशिक्षण स्थानिक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत येथे घेण्यात आले होते.

Team Agrowon

Washim News : पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नैसर्गिक शेती गटांचे दोन दिवसीय प्रशिक्षण स्थानिक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत येथे घेण्यात आले होते. या वेळी आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, प्रकल्प उपसंचालक संतोष वाळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

नैसर्गिक शेतीची, संकल्पना, उद्देश, महत्त्व आणि गरज याविषयी श्रीमती महाबळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन २.० मार्गदर्शक सूचना कार्यपद्धती याविषयी श्री. वाळके यांनी मार्गदर्शन केले.

नैसर्गिक शेती पद्धतीनुसार पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन स्वनिर्मित सेंद्रिय पद्धतीची पीक वृद्धिवर्धक याविषयी श्री. शाह यांनी मार्गदर्शन केले. कार्बन क्रेडीट याविषयी कंपनी प्रतिनिधी प्रवीण कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशीच्या सत्रात विविध पीक अवशेषांचे कम्पोस्ट खत बनविणे याविषयी सर्ग विकास समितीचे कुंवरसिंह मोहने यांनी मार्गदर्शन केले. पीक संरक्षण-पीक नियोजन, सापळा पिके, आंतरपीक लागवड, कीड-रोग निरिक्षण, निविष्ठा उत्पादन व वापर याविषयी शाह यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय दुधे, सचिन इंगोले, रामेश्वर पाटील, संजय राऊत, संगणक आज्ञावली रूपरेषक गुलाम नबी शेख, कार्यालय सहाय्यक संदीप मोरे यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Compartment Bunding: ओलावा संवर्धनासाठी कंपार्टमेंट बांध

Amit Shah: 'मी संसदेत उत्तर देण्यास तयार'; विरोधकांच्या गदारोळावर अमित शहांनी मौन सोडलं

Paneer Adulteration Action: भेसळखोरांवर मकोका; अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Sugarcane Variety: रसवंतीसाठी ऊस जात : कोव्हीएसआय ०३१०२

Sugarcane Pyrilla: उसातील पायरीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन; वेळीच नियंत्रण टाळेल उत्पादनाचे नुकसान

SCROLL FOR NEXT