Traffic Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Traffic Issue : पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यांत अनेक मार्गांवर वाहतूक बंद

Rain Update : पूर्व विदर्भातील गोंदिया आणि भंडारा हे दोन जिल्हे पावसाने सर्वाधिक प्रभावित झाले होते.

Team Agrowon

Nagpur News : पूर्व विदर्भातील गोंदिया आणि भंडारा हे दोन जिल्हे पावसाने सर्वाधिक प्रभावित झाले होते. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी या दोन जिल्ह्यांतील प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पूरस्थिती मात्र कायम असून, अनेक मार्गांवरील वाहतूक देखील बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया या दोन जिल्ह्यांना हमखास पाऊस आणि तलावांचा जिल्हा असे म्हटले जाते. जिल्ह्यात रविवार (८)पासून पावसाची संततधार होती. त्यानंतर बुधवारी (ता. ११) काहीशी उघडीप दिली. मात्र या दरम्यान पावसाने गोंदियात अनेक घरांची पडझड झाली. १९ घरे अंशतः क्षतिग्रस्त झाली आहेत. त्यासोबतच जनावरांच्या गोठ्याचेही नुकसान झाले.

भंडारा जिल्ह्यातही पावसाने ओढ दिली असली तरी गोसेखुर्द प्रकल्पातून सुमारे ३ लाख क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोसेखुर्दसह इतरही प्रकल्पातून सुरू असलेल्या विसर्गाच्या परिणामी काही भागात पूरस्थिती कायम आहे. या जिल्ह्यात तब्बल २८ मार्गांवरील वाहतूक बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

त्यामध्ये सर्वाधिक लाखांदूर तालुक्‍यातील रस्ते मार्गांचा समावेश आहे. साकोली, मोहाडी तालुक्‍यांतही अनेक गावांचा रस्ते संपर्क तुटला आहे. पवनी तालुक्‍यात मात्र परिस्थिती नियंत्रणात असून या भागात रस्ते वाहतूक सुरळीत आहे. भंडारा तालुक्‍यातील भंडारा ते कारधा, करचखेडा ते खमारी हे दोनच मार्ग गुरुवारी (ता. १२) बंद होते.

गडचिरोली जिल्ह्यात दहा रस्ते बंद

गडचिरोली जिल्ह्यात ही पाऊस थांबल्याने पूरस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. मात्र विसर्ग सुरू असल्याने या जिल्ह्यातील दहा मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही स्थिती कायम असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. कोटगल बॅरेज येथे अडकलेल्यांना आपत्ती निवारण पथकाकडून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT