Kolhapur Jaggery Market Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Jaggery Market : कोल्हापूर बाजार समितीत व्यापारी, अडत्यांमध्ये खडाजंगी, गूळ सौदे पाडले बंद

Kolhapur Market Committee : कोल्हापूर जिल्हा मार्केट कमीटीत मागच्या काही दिवसांपासून गुळाचे सौदे सुरू झाले आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Jaggery News : कोल्हापूर जिल्हा मार्केट कमीटीत मागच्या काही दिवसांपासून गुळाचे सौदे सुरू झाले आहेत. दरम्यान आठवड्यातून तीन वेळा हे गुळाचे सौदे होतात जवळपास ५ हजार गूळ रव्यांचे सौदे होतात.

परंतु सौदे झालेल्या गूळ खरेदीची रक्कम १७ दिवसांतच द्यावी, अशी मागणी अडत्यांनी खरेदी व्यापाऱ्यांकडे केली. पण गूळ व्यापाऱ्यांनी महिनाझाले अडत्यांचे पैसे न दिल्याने शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात जोरदार वाद झाला.

यामुळे पुढचे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. यानंतर पुढचे काही तास गूळ सौदे बंद होते. यावर बाजार समितीने मध्यस्ती करत या वादावर पडदा टाकला. वाद मिटवल्यानंतर गूळ सौदे सुरू झाले.

दसरा झाला की कोल्हापूर जिल्ह्यात गुळाचा हंगाम सुरू होतो. मात्र, काही गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत. यामुळे आठवड्यातून काही दिवस गुळाचे सौदे होत असल्याने ४ ते ५ हजार गूळ रव्यांचे सौदे होत आहेत. गूळ अडत्याकडे आल्यावर वर्गीकरण करून गूळ सौद्याला लावतात.

या सौद्यात व्यापारी गूळ खरेदी करतात. त्याचे पैसे अडत्याला दिले जातात. अडते हेच पैसे शेतकऱ्यांना देतात. परंतु व्यापाऱ्यांनी अडत्यांना मागच्या ३० ते ४० दिवसांत पैसेच दिले नसल्याने अडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले यामुळे व्यापारी आणि अडते यांच्यात जोरदार वादावादीचे प्रकार पहायला मिळाले.

यंदाच्या हंगामासाठी अनेक शेतकरी अडत्यांकडे अनामत रक्कम मागत आहेत. ही बाब विचारात घेऊन अडत्यांनी खरेदीदार व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या गुळाचे पैसे (उदारी रक्कम) तसेच या पुढील सौदे व्यवहारातील रक्कम १७ दिवसांत द्यावी, अशी अट घातली. त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. काही व्यापाऱ्यांनी गुळाचे पैसे दीड दोन महिने होऊनही दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला पैसे कोठून द्यावेत, असा प्रश्न अडत्यांनी केला. यातून वाद सुरू झाला आणि सौदे बंद पडले.

व्यापारी व अडते यांची बाजार समितीत बैठक घेण्यात आली. अडते व व्यापाऱ्यांत यापूर्वी ठरल्यानुसार पैशांची देवाण घेवाण व्हावी. यापुढील काळात किती दिवसात पैसे द्यावेत याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेऊ तसेच सौदे आज तातडीने सुरू करावेत, अशा सूचना सभापती भारत पाटील, सचिव जयवंत पाटील यांनी दिल्या. त्यानंतर सौदे पुन्हा सौदे सुरू झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT