Yavatnal Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Yavatnal Market Committee : यवतमाळ बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल

Team Agrowon

Yavatmal News : तुरीच्या दरात वाढ झाल्याने बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली आहे. समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल ठेवण्यात येतो. शेतकऱ्यांना माल ठेवायला जागाच मिळत नसल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी बुधवारी (ता.७) सायंकाळी बाजार समितीत धडक दिली. या वेळी जयस्वाल व बाजार समितीचे उपसभापती किशोर इंगळे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी पैशांची आवश्यकता आहे. दरम्यान, तुरीला समाधानकारक भाव मिळत असल्याने बाजार समितीत आवक वाढली आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल ठेवला जातो.

शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी जागा मिळत नाही. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमाल उघड्यावर ठेवण्याची वेळ येत असल्याची ओरड ऐकायला मिळते.

पाऊस आल्यास शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी होते. यासंदर्भात माहिती मिळताच श्याम जयस्वाल यांनी बाजार समितीत धडक देत प्रशासनाला जाब विचारला.

शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही, झोपण्यासाठी जागा नाही, अशी प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली. त्यामुळे इंगळे व जयस्वाल यांच्यात काहीवेळ शाब्दिक चकमक झाली. आठ दिवसांत शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन उपसभापती इंगळे यांनी दिले. त्यानंतर काही वेळासाठी निर्माण झालेला तणाव निवळला.

बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल ठेवला जातो. शेतकऱ्यांचा माल अनेकदा उघड्यावर राहतो. अनेकदा व्यापाऱ्यांच्या मालाच्या मधातच शेतकऱ्यांचा माल टाकला जातो. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसतो. २५० हमालांची नोंदणी आहे. मात्र बहुतांश हमाल खासगीत काम करतात. त्यामुळे नवीन हमालांना परवाना देण्यात यावा.
श्याम जयस्वाल, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, यवतमाळ
यवतमाळ बाजार समितीत आतापर्यंत प्रशासकराज होते. आम्हाला सत्तारूढ होऊन अवघा आठवडाभराचा कालावधी झाला आहे. कोणत्याही शेतकऱ्यांचा शेतीमाल उघड्यावर राहत नाही. तुरीची आवक वाढली आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने हमाल उपलब्ध होत नाहीत. व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. एकाही शेतकऱ्याची गैरसोय होणार नाही, यासाठी आम्ही आग्रही आहोत. सात दिवसांत शेतकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
किशोर इंगळे, उपसभापती, बाजार समिती, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसाच्या भावात चढ उतार सुरुच; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत ज्वारीचे दर?

Ghatkhed KVK : घातखेड ‘केव्हीके’चे तंत्रज्ञान विस्तारात मोठे योगदान

Chana Cultivation : हरभऱ्याच्या भरघोस उत्पादनासाठी महत्वाच्या तीन गोष्टी

Agriculture Award : सात जणांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

Agro Business : तरुणांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे

SCROLL FOR NEXT