Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : शेतकरी महापंचायतमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च  

जिंदच्या महापंचायतीत मोदी-प्रणित भाजप सरकारच्या 'वादाखिलाफीचा' (विश्वासघाताचा) तीव्र निषेध करण्यात आला.

Team Agrowon

दोन वर्षांपूर्वी २६ जानेवारी २०२१ ला ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचे (Delhi Farmers Protest) दोन वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने २६ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीच्या सीमांवर १ लाख ट्रॅक्टर्सवर (Tractor March) ५ लाख स्त्री-पुरुष शेतकऱ्यांची विशाल परेड काढण्यात आली.

या परेडमध्ये सर्व किसान संघटनांसोबत अखिल भारतीय किसान सभेच्या हरियाणा आणि पंजाब राज्यांचा (Punjab, Haryana State) त्यात सहभाग होता.

जिंद, हरियाणा येथे संयुक्त किसान मोर्चातर्फे (एसकेएम) विशाल महापंचायतीचे (Kisan Panchayat) आयोजन करण्यात आले होते. 

जिंदच्या महापंचायतीत मोदी-प्रणित भाजप सरकारच्या 'वादाखिलाफीचा' (विश्वासघाताचा) तीव्र निषेध करण्यात आला.

किफायतशीर आधारभावाची कायदेशीर हमी, शेतकरी-शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती व त्यांना वाढीव पेन्शन, वीज दुरुस्ती विधेयक रद्द करणे, पीक विमा योजनेत आमूलाग्र शेतकरीधार्जिणे बदल, या शेतकऱ्यांच्या उर्वरित ज्वलंत मागण्यांसाठी देशभर आंदोलन जास्त तीव्र करण्याची हाक देण्यात आली. 

संयुक्त किसान मोर्चाच्या हाकेनुसार देशभर जिल्हा स्तरावर ट्रॅक्टर मार्च काढण्यात आले व त्यात लाखो शेतकऱ्यांनी भाग घेतला.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा व तालुका पातळ्यांवर ट्रॅक्टर मोर्चे, मोर्चे व निदर्शने यशस्वी झाली.

त्यात हजारों शेतकऱ्यांनी भाग घेतला. राष्ट्रीय प्रश्नांसोबत महाराष्ट्रात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीची नुकसानभरपाई, पीक विमा भरपाई, शेतमालाला रास्त भाव, उर्वरित कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, जमिनीच्या हक्काचे इतर प्रश्न हे राज्यातील व स्थानिक प्रश्न सुद्धा २५ जानेवारीच्या कृतींत घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे २१ हून अधिक जिल्ह्यांत हे मोर्चे-निदर्शने झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT