Education Agrowon
ॲग्रो विशेष

CSR Fund : टोयोटाची सामाजिक जबाबदारी! शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा क्षेत्रात पुढाकार

Toyota CSR Work : जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये टोयाटो कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विकासात्मक काम करण्यासाठी तयारी दर्शवली आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात टोयाटो कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडी, शाळा पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात जिल्हा प्रशासनासोबत काम करण्यास तयार असल्याचा निर्णय मंगळवारी (ता. २९) झालेल्या बैठकीत झाला.

टोयाटो कंपनीचे देशाचे मुख्य कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन चर्चा केली.

जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये टोयाटो कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विकासात्मक काम करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत लोकाभिमुख सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य, सौर ऊर्जा याक्षेत्रात हा सहभाग असेल.

टोयाटोचे कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप दळवी म्हणाले, की कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी उपलब्धतेसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानाबरोबरच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षणा आणि तांत्रिक शिक्षण यावर काम करीत आहे.

व्यक्तीच्या जीवनामध्ये मूलभूत बदल करण्यामध्ये टोयाटो कंपनी जिल्हा प्रशासनासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य कंपनीमार्फत करण्यात येईल. जिल्हाप्रशासनातर्फे एकत्र काम करण्यासाठी येणाऱ्या सर्व परवानगी यामध्ये सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT