Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : कोल्हापुरात वळवाच्या पावसाने भाजीपाला, आंबा बागांना फटका

sandeep Shirguppe

Kolhapur Stormy Rain : कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या आठ दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. मे महिन्यात झालेल्या वळवाच्या पावसाने ऊस पिकाला दिलासा मिळाला तर भाजीपाला पिकांना काही अंशी फटका बसला आहे. दरम्यान अनेक तालुक्यातील आंब्याच्या बागांना वळीव पावसाचा मोठा दणका बसला आहे.

कोल्हापूर शहरात मात्र पावसाचे वातावरण व्हायचे पण वळीव पडत नव्हता. काही वेळा पावसाचा शिडकावा व्हायचा. काल मात्र वळवाने शहरावासीयांची प्रतीक्षा पूर्ण केली. दुपारी तीनपासूनच पावसाळी वातावरण तयार झाले होते. शहराच्या सर्व भागांत ढग दाटून आले होते. सोसाट्याचा वारा सुरू झाला. विजाही चमकल्या. सायंकाळी चारच्या सुमारास शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात पावसाला सुरुवात झाली.

मध्यवस्तीतही जोरदार पाऊस पडला. सुमारे अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. त्यानंतर काही काळासाठी वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, संध्याकाळी सातनंतर पुन्हा उष्मा जाणवू लागला.

मोटारीवर थेट झाड कोसळलं

जोतिबा देवाचे दर्शन घेऊन घाटातून कोल्हापूरकडे निघालेल्या रायगड जिल्‍ह्यातील भाविकांच्या मोटारीवर वादळी पावसात अचानक झाड कोसळले. त्यात मोटारीतील तीन भाविक जखमी झाले. जखमी सुलोचना मनोहर कुंभार (वय ७३), मनोहर सुंदर कुंभार (७५), ज्योती चिंतामणी कुंभार (५५) यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

रायगड जिल्ह्यातील भाविक सकाळी दर्शनासाठी आले होते. येथून ते दुपारी अंबाबाई मंदिराकडे निघाले होते. या दरम्यान अचानक वादळी पाऊस आला. त्यातच त्यांच्या मोटारीवर झाड कोसळले. आरडा ओरडा झाल्यानंतर स्थानिकांनी गाडीतील भाविकांना बाहेर काढले. झाड पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली. झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

जोतिबा डोंगर, पोहाळे, कुशिरे, गिरोली भागातही मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शेड घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. वीज वाहक तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT