Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : आजऱ्यात नदीकाठावरील १९ गावांना पुराचा धोका

Risk of flooding :आजरा तालुक्यात हिरण्यकेशी, चित्रा व चिकोत्रा या नदीकाठावरील १९ गावांना पुराचा धोका आहे.

Team Agrowon

Kolhapur News : आजरा तालुक्यात हिरण्यकेशी, चित्रा व चिकोत्रा या नदीकाठावरील १९ गावांना पुराचा धोका आहे. पुरामध्ये या गावातील १४० हेक्टर शेतजमीन बाधीत होते. संभाव्य धोक्याचा विचार करता प्रशासनाकडून संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे.

लवकरच तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्यात येणार आहे. तत्पूर्वी तहसीलदार समीर माने यांनी तालुक्यातील विविध विभागांची बैठक घेऊन आपत्ती काळात घ्यावयाची खबरदारी व उपाययोजना याबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याबाबतचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे.

आजरा तालुक्यात दरवर्षी सरासरी दोन हजार मिमी पाऊस पडतो. दरवर्षी अतिवृष्टी ठरलेली आहे. त्यामुळे तालुक्यात दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होत असते.

२००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील सर्वच गावांत घरांची पडझड व पिकांची हानी झाली होती. यापूर्वी १९८४ व १९८९ मध्ये तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

२०१९ मध्ये हिरण्यकेशी व चित्रीला आलेल्या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड व पिकांची हानी झाली होती. त्यामुळे तालुक्यात संभाव्य आपत्ती लक्षात घेता प्रशासनाने आतापासून पावले उचलली असून संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, वीज, एसटी यासह विविध विभागांची बैठक महसूल प्रशासनाने नुकतीच घेतली.

तहसीलदार समीर माने यांनी आवश्यक सूचना दिल्या. आपत्ती काळात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. सर्वांनी दक्ष व सजग रहावे, अशी सूचना केली.

आपत्ती पूर्व तयारीचा आढावा या वेळी घेतला. याबाबतचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT