Women Empowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे : शेलार

तेजस्विनी या प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

Team Agrowon

Akola News : महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने जिल्हास्तरावर महिला बचत गटाव्दारे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सव ‘तेजस्विनी’ चे आयोजन शुक्रवार (ता.२४) ते रविवार (ता.२६) दरम्यान स्वराज भवन मैदानावर करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचा अकोलेकर नागरिक, महिला तसेच सर्व वयोगटाच्या व्यक्तींनी घ्यावा व महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

तेजस्विनी या प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती वर्षा खोब्रागडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने आदी उपस्थित होते.

श्रीमती वर्षा खोब्रागडे यांनी माहिती दिली, की प्रदर्शनात जिल्ह्यातील सात तालुक्यातील ८० बचतगट सहभाग घेणार आहेत. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन ‘तेजस्विनी’ चे आयोजन करण्यात आले आहे.

महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने या प्रदर्शनात पाहणी व विक्रीसाठी उपलब्ध असतील. महिलांना उत्पादन, मार्केटिंग, व्यवसायाचे ज्ञान मिळावे यासाठी विविध विषयांतील तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आले आहेत. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही होणार आहेत.

श्री. शेलार म्हणाले, की बचत गटाव्दारे उत्पादित वस्तूंची अधिकाधिक विक्री व्हावी व बचतगट चळवळीला चालना मिळून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला वाव मिळावा, यासाठी हे प्रदर्शन आहे. त्यात वस्तू, पदार्थांची विक्री होणार आहे, असेहा त्या म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT