Revanth Reddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Revanth Reddy : जगाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ

Davos Economic Forum : आपल्याकडे शेतीची मोठी समस्या आहे. शेतकरी आत्महत्या ही भारतातील सर्वांत मोठी समस्या आहे.

Team Agrowon

Davos News : शेतीला फायदेशीर क्रियाकलाप करण्यासाठी शाश्वत मॉडेल तयार करण्याची आवश्यकता असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी सांगितले. दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत अन्न प्रणाली आणि स्थानिक कृती या विषयावरील सीईटी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी नेत्यांना केले.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूइएफ) ५४ व्या वार्षिक परिषदेचा शुक्रवारी (ता. १९) समारोप झाला. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत रेड्डी यांचे भाषण झाले. रेड्डी म्हणाले की, शेती ही आपली संस्कृती आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेती हीच आमची संस्कृती आहे.

मी तेलंगणा या भारतातील एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रतिनिधित्व करतो. मी एका छोट्या गावात वाढलो आणि मला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण आहे. ते म्हणाले, की आपल्याकडे शेतीची मोठी समस्या आहे.

शेतकरी आत्महत्या ही भारतातील सर्वांत मोठी समस्या आहे. शेतकरी त्यांचे उत्पादन विकू शकत नाहीत, ते नफा कमावू शकत नाहीत; त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही. शेतकऱ्यांनी नेहमीच जगाला मदत केली आहे. आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे.

तेलंगणामधील काँग्रेस सरकारच्या ‘रयथू भरोसा’बाबत रेड्डी म्हणाले, की माझ्या पक्षाने (काँग्रेस) शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किमतीचे धोरण सुरू केले आहे. गुंतवणुकीसाठी आम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतो; त्याचे नाव ‘रयथू भरोसा’ आहे. ते म्हणाले, की माझे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचे माझे स्वप्न आहे.

आपण ते करू शकलो तर ९९ टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. कॉर्पोरेट क्षेत्रातील गुंतवणुकीवर परतावा मिळतो तशी मी सर्व नेत्यांना विनंती करतो. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘डब्ल्यूइएफ’ने नेहमीच जगाला मदत केली आहे आणि आता जगाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.

जागतिक अन्न पारितोषिक विजेते डेव्हिड नब्बारो आणि टांझानियाचे उपाध्यक्ष फिलीप मपॅंगो यांच्यासह उपस्थितांनी मुख्यमंत्री श्री. रेड्डी यांच्या भूमिकेचे स्वागत केले. मुख्यमंत्री रेवंत यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांची भेट घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT