Tiger Terror  Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Terror : येडशी अभयारण्य परिसरात वाघाचा पुन्हा वावर

Tiger Attack : येडशी अभयारण्य आणि घाट परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Team Agrowon

Solapur News : येडशी अभयारण्य आणि घाट परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. शनिवारी (ता.१) सकाळी सव्वा आठच्या सुमारास येडशीचे रहिवासी विलास काळे हे मोटारसायकलवर प्रवास करत असताना त्यांना वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले.

वाघाने पुणे-लातूर महामार्ग ओलांडून घोळवेवाडीच्या दिशेने कूच केल्याचे त्यांनी पाहिले. या परिसरात यापूर्वी वाघाने येडशीचे संघरत्न ताकपिरे यांच्या गाईवर हल्ला केला होता. त्यात गाईचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा वाघ दिसल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

वन विभागाने वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले असून, त्याचा मागोवा घेण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील वडगाव शिवारात वाघाने एका वासरावर हल्ला केला होता.

मात्र, त्यानंतर त्याने अन्य कोणत्याही पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याची नोंद नाही. वाघाला सुरक्षितपणे पकडण्यासाठी पुणे रेस्क्यू पथक अथक प्रयत्न करत आहे. परिसरात कॅमेरे बसवून त्याच्या हालचालींचे निरीक्षण सुरू आहे.

मात्र, वाघ अत्यंत सावध असल्याने तो पथकाच्या टप्प्यात येत नाही. त्यामुळे त्याला जेरबंद करणे अधिक कठीण बनले आहे. रेस्क्यू पथकाने शोधमोहीम राबवली असून वाघ वेगवेगळ्या दिशांना भ्रमंती करत असल्याने अडचणी येत आहेत.

वाघाच्या हालचालींमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून शेतकरीही चिंतेत आहेत. वाघाला कोणतीही हानी न पोहोचवता त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. स्थानिक नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Fire Prevention Plan: वणव्यांच्या प्रतिबंधासाठी १३२ किलोमीटरची जाळरेषा

Indian Journalism: बारकावे शोधून पत्रकारिता करावी: ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ

Agri College Administration Changes: कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महानंद माने यांची उचलबांगडी

Water Conservation: भूजल पुनर्भरणाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे : नितीन गडकरी

Ai in Farming: प्रतापराव पवार यांचे कृषी ‘एआय’ वापराचे काम उल्लेखनिय : गडकरी

SCROLL FOR NEXT