Tiger Terror  Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Attack : उक्कडगावात जनावरांच्या कळपावर वाघाचा हल्ला

Tiger Terror : गेल्या एक महिन्यापासून बालाघाटाच्या पायथ्याशी येडशी आणि ढेंबरवाडी वनपरिक्षेत्रात वाघाने पाळीव जनावरांवर हल्ल्यांची मालिका सुरू ठेवली आहे.

Team Agrowon

Solapur News : येडशी अभयारण्य आणि ढेंबरवाडी वनपरिक्षेत्रात चार दिवसांपासून वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील टीम आणि वनविभागाने जोरदार मोहीम राबवली असताना, वाघाने आज (ता. १७) चकवा देत, बार्शी तालुक्यातील उक्कडगाव शिवारात हल्ला केला.

नामदेव ऊर्फ दादाराव गोविंद थोरात यांच्या ५० जनावरांच्या कळपावर हल्ला करून वाघाने दोन म्हशी आणि एका जर्सी कालवडीला ठार केले. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास पठाडे तलावाजवळ घडली.

गेल्या एक महिन्यापासून बालाघाटाच्या पायथ्याशी येडशी आणि ढेंबरवाडी वनपरिक्षेत्रात वाघाने पाळीव जनावरांवर हल्ल्यांची मालिका सुरू ठेवली आहे.

मंगळवारी येडशी परिसरात एका गाईवर हल्ला करून तिला ठार केल्यानंतर ताडोबा टीमने वाघाला जेरबंद करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली होती. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाचा वावर कैद झाल्यानंतर वनविभागाने हालचाली वेगाने सुरू केल्या.

येडशी अभयारण्य परिसरात तैनात असलेल्या धाराशिव, सोलापूर, लातूर, उदगीर, भूम, परंडा, सांगोला आणि मोहोळ येथील वनअधिकारी व कर्मचारी वाघाला पकडण्यासाठी सज्ज होते. मात्र, आज वाघाने उक्कडगाव शिवारात हल्ला करत परिसरात पुन्हा दहशत निर्माण केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT