Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : वादळी पावसाचा अंदाज कायम

गोव्यापासून अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ आणि मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Team Agrowon

Pune Weather News : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह पश्चिम विदर्भाच्या काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात गारपिटीनेही तडाखा दिला आहे. आज (ता. ८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे. यातच राज्यात उन्हाचा चटकाही कायम राहण्याचा अंदाज आहे.

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. बुहतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाच्या झळा जाणवत असून, घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे देशातील उच्चांकी ३९.३ अंश तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथील यंदाच्या हंगामातील हा उच्चांक आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि रत्नागिरी येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंदले गेले.

दरम्यान, गोव्यापासून अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ आणि मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. नैॡत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे.

आज (ता. ८) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून विजा आणि मेघगर्जना, विजा, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.३ (१७.४), जळगाव ३५.४ (१८.०), धुळे ३४.५ (१६.०), कोल्हापूर ३४.४ (२०.३), महाबळेश्वर २९.८ (१४.४), नाशिक २५.९ (१६.४), निफाड २६.६(१५.८), सांगली ३४.९ (१९.५), सातारा ३४.८ (१९), सोलापूर ३६.८ (२०), सांताक्रूझ ३९.३ (२४.५), डहाणू ३४.७ (२१.६), रत्नागिरी ३७.२ (२३), छत्रपती संभाजीनगर ३३.७ (१३.२),

नांदेड ३३.२ (१८.६), परभणी ३५.०(१८.६), अकोला ३५.७ (१७), अमरावती ३६.२(१६.७), बुलडाणा ३१(१५), ब्रह्मपुरी ३७.८ (१९.९), चंद्रपूर ३७.२ (२०.६), गडचिरोली ३५.६(१५.८), गोंदिया ३५.६ (१८.२), नागपूर ३५ (१९), वर्धा ३६.५(१९), वाशीम ३६.८ (१४.२), यवतमाळ ३५ (१७.५).

बुधवारी (ता. ८) राज्याच्या विविध भागातील वादळी पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, बीड.

विदर्भ : बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

SCROLL FOR NEXT