Paddy Season Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Threshing : रोह्यात झोडणी-मळणीची कामे खोळंबली

Unseasonal Rain Update : हवामान खात्याने अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यात वातावरणात ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे रोहा ग्रामीण भागातील भातशेतीची झोडणी, मळणीची कामे खोळंबली आहेत.

Team Agrowon

Roha News : हवामान खात्याने अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यात वातावरणात ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे रोहा ग्रामीण भागातील भातशेतीची झोडणी, मळणीची कामे खोळंबली आहेत.

दिवाळीनंतर साधारणपणे आठ ते दहा दिवसांमध्ये शेतीची झोडणी व मळणीची कामे उरकणे आणि नव्या हंगामातील पूर्व तयारी करून कामे करण्याची परंपरा आहे. परंतु यावर्षी दिवाळीत अवकाळी पाऊस आणि त्यानंतर ढगाळ वातावरण राहत आहेत. आताही कोणत्याही वेळी अवकाळी पाऊस पडण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

त्यातच बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस कधीही कोसळू शकतो, ही भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. शेतमालाचे कोणतेही नुकसान होऊ नये,

यासाठी पुरेशी खबरदारी घेतली असून, कापणी केलेले भाताची मळणी करून साठवून ठेवले आहेत. तसेच अवकाळी पावसामुळे मळणीतील भात भिजू नये, यासाठी प्लास्टिकच्या कापडाने त्यांना झाकले आहेत.

हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मळणी झाकून ठेवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरू नये, यासाठी ही उपाययोजना करावी लागते.
नंदकुमार मरवडे, शेतकरी, कोलाड विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT