Rice Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Farming : पेणमधील हजारो एकर भातशेती पाण्यात

उघाडीचे काम सुरू असताना पूर्व कल्पना न देता ठेकेदाराने कामासाठी बांधलेले बांध फोडला.

Team Agrowon

Pen News : पेण तालुक्यातील खारेपाट, वाशी, सरेभाग विभागातील उघाडीचे काम निकृष्ट दर्जाच्या झाल्यामुळे वारंवार ते फुटत असल्याने हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊन शेतीचे मोठे नुकसान (Rice Crop Damage) झाले आहे.

उघाडीचे काम सुरू असताना पूर्व कल्पना न देता ठेकेदाराने कामासाठी बांधलेले बांध फोडला. यामुळे तीन दिवसांपूर्वी झालेल्या उधाणामुळे खारे पाणी शिरल्‍याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सरेभाग येथील टॉवरजवळील उघाडीचे कामासाठी पाणी अडवण्याकरिता तयार केलेला बांध ठेकेदाराने समुद्राची भरती-ओहोटीची वेळ लक्षात न घेता फोडल्याने खारे पाणी भातशेतीत शिरले. त्‍यामुळे जवळपास ५०० ते ६०० एकर शेतीचे नव्याने नुकसान झाले आहे.

याप्रकरणी जबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आतापर्यंत सरेभागात जवळपास हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकरी हताश झाले आहेत.

पेणमधील वाशी, सरेभाग येथील उघाडीबाबत खारलॅड विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. ही उघाडी वारंवार फुटून खारेपाणी शेतीत शिरल्‍याने हजारो एकर शेतीचे तसेच आजूबाजूला घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यावी व नुकसान भरपाई द्यावी.
राजन झेमसे, शेतकरी
वाशी-सरेगाव येथील उघाडीचे काम सुरू आहे. शेतात पाणी शिरल्‍याने नुकसान झाले आहे, याबाबत चौकशी सुरू आहे. या संदर्भात उघाडीचे कामाच्या दर्जाबाबत तज्‍ज्ञांकडून पाहणी करून लवकरच योग्‍य निर्णय घेऊ.
राजेंद्र खेडेकर, अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT