Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : तेरा हजारांवर शेतकऱ्यांना विमा परतावे नाही

खरीप हंगामात पीक विम्याच्या परताव्यापासून १३ हजार ६७२ शेतकरी अद्यापही वंचित आहेत.

Team Agrowon

Amravati News : खरीप हंगामात पीक विम्याच्या परताव्यापासून १३ हजार ६७२ शेतकरी अद्यापही वंचित आहेत. आगामी खरीप हंगाम डोक्यावर आला असताना सरलेल्या हंगामातील परतावे न मिळाल्याने वंचित शेतकऱ्यांनी कृषी विभागावर आगपाखड केली आहे.

तर या शेतकऱ्यांना परतावे मिळवून देण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू असून, या महिन्याच्या अखेरपर्यंत ते मिळती अशी अपेक्षा कृषी विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, २४ हजार ८५५ शेतकऱ्यांना विमा कंपनीने ठरविले अपात्र ठरविले आहे.

खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये २ लाख १९ हजार ३२१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेत प्रीमियम भरला आहे. हंगामादरम्यान नैसर्गिक आपत्ती आल्यास व त्यामुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, अशी आशा त्यांना होती.

हंगामादरम्यान ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी ७२ तासांत पीकविमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या १ लाख १५ हजार २२३ व काढणीपश्‍चात आपत्तीच्या ९२२४ अशा एकूण १ लाख २४ हजार ४४७ तक्रारी विमा कंपनीकडे दाखल झाल्या आहेत. यातील ९९ हजार ५९२ तक्रारी पात्र ठरविण्यात आल्या. तर २४,८५५ तक्रारी अपात्र ठरविण्यात आल्या. यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या २२,८१० व काढणीपश्‍चातच्या २०४५ तक्रारींचा समावेश आहे.

पात्र ठरविण्यात आलेल्या एकूण तक्रारींमधील ८५ हजार ९२० शेतकऱ्यांना परतावे मिळाले असून, त्यांना एकूण ९१ कोटी ४६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.

यातीलच अजून १३ हजार ६७२ विमाधारक शेतकऱ्यांना परतावे मिळालेले नाहीत. कृषी विभागाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत असला, तरी विमा कंपनीची भूमिका मात्र अडचणीची जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे आगामी खरीप हंगाम डोक्यावर आला आहे.

तालुकानिहाय वंचित शेतकरी संख्या

अचलपूर ३१४, अमरावती ६७२, अंजनगावसुर्जी २९०, भातकुली ८९६, चांदूर रेल्वे ७८८, चांदूर बाजार १,०००, चिखलदरा ३५, दर्यापूर ४२४, धामणगावरेल्वे २४४, धारणी ६८, मोर्शी १५१०, नांदगाव खंडेश्वर ५८५२, तिवसा १४४१, वरूड १३८

परताव्यापासून वंचित राहिलेल्या १३ हजार ६७२ शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आमचा विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत परतावे मिळणे अपेक्षित आहे.
अनिल खर्चान, उपसंचालक, जिल्हा कृषी कार्यालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT