Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage In Sangli : दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाई भासणार

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या तालुक्यात टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले असले तरी, या योजनेच्या माध्यमातून लाभ क्षेत्रातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाही.

Team Agrowon

Sangli Water Shortage Update : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या तालुक्यात टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले असले तरी, या योजनेच्या माध्यमातून लाभ क्षेत्रातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाही.

त्यातच वाढत्या उष्णनेते भूजल पातळी खालावली लागली असल्याने दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाई भासणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरु दुष्काळी पट्ट्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुरु केल्या जातात. यंदाच्या हंगामात टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजना वेळेत सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

परंतु उपसा सिंचन योजना उशिरा सुरु झाली. परंतु पूर्ण क्षमतेने योजना सुरु नाही. उपसा सिंचन योजना सुरु करून दुष्काळी भागातील शेतीची तहान भागवली आहे.

यंदाच्या हंगामात टेंभू उपसा सिंचन योजना वेळेत सुरु झाल्याने आटपाडी, तालुक्यासह अन्य लाभ क्षेत्रातील गावात योजनेचे पाणी वेळेत मिळाले. त्यामुळे जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत पाणी टंचाई भासली नाही.

दरम्यान, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी सुरु केली. परंतु याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी योजना सुरु करण्याचे आदेश दिले. योजना सुरु झाली.

परंतु पूर्ण क्षमतेने योजना सुरु झाली नाही. परिणामी जत तालुक्यात पाणी पोहोचण्यासाठी विलंब होत झाला. मुळात दुष्काळी पट्ट्यात वाढत्या उष्णतेने मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

वास्तविक पाहता, या योजनेचे आवर्तन केवळ मुख्य कालव्यातूनच पुढे जात असल्याने कालव्या लगत असणाऱ्या शेतीला याचा फायदा होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT