Water Bill Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bill Recovery : ऊस बिलातून पाणीपट्टीची कपात होणार नाही

Sugarcane Bill : शेतकऱ्यांच्या वाढीव पाणीपट्टी वसुलीबाबत तक्रर आल्यानंतर वाढीव पाणीपट्टीबाबत माहिती घेऊन राज्याचे सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास पाणीपट्टीमध्ये झालेली वाढ दाखवून देण्यात आली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाटबंधारे विभागामार्फत कपात केली जाणारी पाणीपट्टीची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

बाळासाहेब बेंडे म्हणाले, की वार्षिक सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार मागील तीन वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडून कपात करण्यात येणार्या पाणीपट्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात करून पाटबंधारे विभागाला वसूल करून देण्यात येत होती.

तथापी चालू वर्षी पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या पहिल्या पंधरवडा बिलातून नेहमीप्रमाणे पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या वाढीव पाणीपट्टी वसुलीबाबत तक्रर आल्यानंतर वाढीव पाणीपट्टीबाबत माहिती घेऊन राज्याचे सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास पाणीपट्टीमध्ये झालेली वाढ दाखवून देण्यात आली.

त्यावर वळसे पाटील यांनी त्वरित निर्णय घेऊन ही पाणीपट्टी कपात न करण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे कारखाना प्रशासनास सूचना करण्यात आल्या आहेत. वळसे पाटील हे आजपर्यंत नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आले असून शेतकरी हिताचेच निर्णय घेत असतात. त्यानुसार कोणाच्याही इशाऱ्यानुसार पाणीपट्टी कपात न करण्याचा निर्णय घेतला नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेऊन त्यानुसार कारखाना प्रशासनास सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT