River Pollution  Agrowon
ॲग्रो विशेष

River Pollution : कृष्णा-वारणा नदी प्रदूषणाबाबत गांभीर्य नाही

Warna River Pollution : कृष्णा आणि वारणा नदी गेल्या काही दिवसांत मासे मरण्याचा प्रकार घडला त्यातच दोन दिवसांपूर्वी कृष्णा नदीत दोन मगरींचा मृत्यू झाला.

Team Agrowon

Sangli News : कृष्णा आणि वारणा नदी गेल्या काही दिवसांत मासे मरण्याचा प्रकार घडला त्यातच दोन दिवसांपूर्वी कृष्णा नदीत दोन मगरींचा मृत्यू झाला. दूषित आणि रासायनिक पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र कृष्णा आणि वारणा नद्यांत प्रदूषण होत आहेत.

याकडे प्रदूषण मंडळ, जिल्हा प्रशासन, आणि राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे या साऱ्याची जबाबदारी प्रदूषण मंडळ जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार घेणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कृष्णा नदीत रसायन मिश्रित, सांडपाणी आणि मळी हे पाण्यात मिसळले जाते. यामुळे पाणी दूषित होते हे काही नवीन नाही. कृष्णा आणि वारणा काठी जवळपास सात साखर कारखाने आहेत. तर डझनभर छोटे-मोठे उद्योग आहेत.

लहान मोठ्या उद्योगांचे सांडपाणीही नदीत सोडले जाते. तर कारखान्यांच्या मळीचे पाणी कृष्णा नदीत चोरून सोडले जाते. मात्र या दूषित पाण्यामुळे गेल्या काही वर्षांपासून माशांचा मृत्यू होत आहे. मात्र याकडे प्रदूषण मंडळासह अन्य संबंधित विभागाने काणाडोळा केला आहे.

गेल्या वर्षी कारखान्यांच्या मळीचे पाणी नदीत सोडले होते. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी दूषित झाले असल्याने माशांचा मृत्यू झाला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या बाबत सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखाना आणि सांगली महापालिकेला नदी प्रदूषण केल्याबद्दल दंड केला होता.

मात्र हा दंड वसूल झाला का नाही, याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. नदी प्रदूषण केल्याबद्दल संबंधित विभागाकडून कारवाई केली जाते, मात्र साखर कारखाने आणि उद्योजक हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने होणारी कारवाई कागदोपत्रीच असल्याचे बोलले जात आहे.

नदीकाठच्या सर्व गावांचे सांडपाणी थेट नदीपात्रात

कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या छोट्या-मोठ्या सर्वच गावांचे सांडपाणी, मलमूत्रयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. ज्या अर्थी हागणदारीमुक्त गाव झाले, त्या अर्थी गावात स्वच्छतागृहे झाली आणि ती नदीच्या मुळावर उठली, असेही म्हणता येईल.

कारण हे सगळे पाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडण्याचे पाप ही गावे करत आहेत. जिल्हा परिषदेने सक्तीने या गावांना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास भाग पाडले पाहिजे. मात्र ते होत नाही. एकाही गावात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT