Buldana News  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : सिंचन संस्कृतीशिवाय समृद्धी नाही ः चौधरी

Irrigation Culture : ‘‘सिंचन संस्कृती तयार होत नाही तोपर्यंत आपण कितीही धरणे बांधली तरी काहीही होणार नाही.

Team Agrowon

Buldana News : ‘‘सिंचन संस्कृती तयार होत नाही तोपर्यंत आपण कितीही धरणे बांधली तरी काहीही होणार नाही. आज दुसरीकडे २५० मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या आजनाळे गावात जलक्रांती होते हे आपण पाहतच आहोत. त्‍यामुळे सिंचन संस्कृती निर्माण केल्याशिवाय आपण समृद्ध होऊ शकणार नाही,’’ असे मत जलतज्ज्ञ सुधाकर चौधरी यांनी व्यक्त केले.

सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने ‘अभिता’ ॲग्रोतर्फे शुक्रवार (ता.१२) ते सोमवार (ता.१५) या काळात कृषी महोत्सव आयोजिला आहे.

याच्या उद्घाटनप्रसंगी चौधरी बोलत होते. भाऊसाहेब शेळके, ‘अभिता’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील शेळके, ॲड. जयश्री शेळके, तसेच धिरेंद्रकुमार देसाई (गुजरात), सुखजितसिंग भंगू (पंजाब), प्रीतम सिंग (हरियाना), सुरेंद्र अवाना (राजस्थान), पांडुरंग पाटील (गोवा) आणि रवींद्र मेटकर (महाराष्ट्र) हे ‘आयसीआर’चे पुरस्कार विजेते शेतकरी उपस्थित होते.

सुनील शेळके म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना नवा दृष्टिकोन मिळावा, नव तंत्रज्ञान पाहता यावे, या हेतूने हे कृषिप्रदर्शन भरविले आहे. सिंदखेडराजा हे ऐतिहासिक शहर आहे. आपण जिजाऊ मासाहेबांचा इतिहास सांगताना, शिवाजी महाराजांचे कार्य आठवताना या महामानवांचे सिंचन, शेतीतील योगदान विसरता येणार नाही.

त्यांनी त्या काळात सिंचनासाठी तलाव उभारले होते. कृषी संस्कृतीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. हा महोत्सव शेतकऱ्यांना निश्‍चितच दिशा देणारा ठरेल.’’

अवाना म्हणाले, ‘‘आपण नैसर्गिक शेती आणि थेट मार्केटिंग करतो. यामुळे आपले आठ ते दहापट उत्पन्न वाढले. शेतकऱ्याने शेतीसोबतच पशुपालन केले पाहिजे. यातून दररोज पैसा घरात येतो. जयपूर शहरात आपण ५०० कुटुंबांचा पारिवारिक शेतकरी बनलेलो आहे. ’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT