Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : पदभार द्यायलाही ‘दर्जा’चा अधिकारी मिळेना

Agriculture News : जिल्ह्यात उपविभागीय कृषी अधिकारी पदांचा पदभार द्यायलासुद्धा त्या दर्जाचे अधिकारी नसल्याची शोकांतिका समोर आली आहे.

Team Agrowon

Akola News : कृषी क्षेत्राच्या दृष्टीने एक महत्त्वाचा जिल्हा असूनही अकोल्याकडे शासन, प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कृषी विभागाचा कारभार चालवणे अवघड बाब झाली आहे. तर याचा परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. जिल्ह्यात उपविभागीय कृषी अधिकारी पदांचा पदभार द्यायलासुद्धा त्या दर्जाचे अधिकारी नसल्याची शोकांतिका समोर आली आहे.

जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात अवजारे बँक योजना अंमलबजावणीत मोठी अनियमितता झालेली असून, गटांकडून लाटलेले अनुदान वसुलीची कार्यवाही केली जात आहे. या प्रकरणात विधिमंडळात नामोल्लेख झालेले उपविभागीय कृषी अधिकारी हे दोन दिवसांपूर्वी महिनाभराच्या अर्जित रजेवर गेले असून, त्यांचा पदभार चक्क मंडळ कृषी अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना द्यावा लागला आहे.

अकोट व अकोला या दोन्ही उपविभागांचा कारभार हे एकच अधिकारी सांभाळत होते. ते १५ फेब्रुवारीपर्यंत अचानक रजेवर गेले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणचा कारभार चालविण्यासाठी जिल्हा अधीक्षकांनी पदभार सोपवला आहे.

अकोला उपविभागीय कृषी अधिकारी पदभार तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर यांना दिला. अकोट उप विभागाचा पदभार तेल्हारा तालुका कृषी अधिकारी म्हणून प्रभार पाहत असलेले मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांना देण्यात आला.

तेल्हारा तालुका कृषी अधिकारी बदलून गेल्यापासून राऊत हेच कारभार चालवत आहेत. तर अकोटचे कृषी अधिकारी प्रशिक्षणासाठी महिनाभर बाहेर असल्याने तेथे कृषी पर्यवेक्षक अनंत देशमुख हा पदभार सांभाळत आहेत. अशा स्थितीत अकोट उपविभागीय कृषी अधिकारी पदाची जबाबदारी राऊत यांच्याकडे देण्याशिवाय पर्याय नव्हता. विभागात सातत्याने पदे रिक्त ठेवली जात असल्याने या घटना वारंवार घडत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने मान्य केले.

‘त्या’ बैठकीनंतर घडल्या घडामोडी

अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बैठक घेत विविध योजनांचा आढावा घेतला. या बैठकीत राज्यभर गाजत असलेल्या पोकरा घोळ प्रकरण कार्यवाहीचा मुद्दा चांगलाच चर्चिला गेला. वरिष्ठांच्या निर्देशानुसार संबंधितांविरुद्ध तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशच मुळे यांनी दिले.

पोकरा घोळाचे प्रकरण विधीमंडळात गाजल्यानंतर कार्यवाहीला वेग आलेला आहे. शेतकऱ्यांविरुद्धच कारवाई केली जात असल्याचे चित्र सध्या तयार झालेले असून कृषी खाते आता आपली प्रतिमा सुधारण्याची धडपड करू लागल्याचे एकूणच या घडामोडींवरून दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT