Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : ऊसतोड महामंडळाची रक्कम भरल्याशिवाय गाळप परवाना नाही

Sugarcane Crushing License : राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

Team Agrowon

Nanded News : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे गाळप हंगाम २०२१-२२ मधील देय असलेल्या प्रती टन चार रुपयांपैकी तीन रुपयांचा भरणा केल्याशिवाय संबंधित साखर कारखान्यांना २०२४-२५ हंगामाचा गाळप परवाना देण्यात येणार नाही, असे परिपत्रक साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जारी केले आहे.

राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

या महामंडळासाठी साखर कारखान्यांनी प्रतिटन दहा रुपये दरवर्षी महामंडळाच्या खात्यात जमा करावयाची आहेत. याबाबत राज्याच्या साखर आयुक्तालयाने ता. ३० ऑक्टोबर २०२३ व नंतर काढलेल्या तीन पत्रांद्वारे साखर कारखान्यांनी ऊसतोड महामंडळाची रक्कम द्यावी असे निर्देश दिले होते.

याचा उल्लेख करून साखर आयुक्तांनी ता. ९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये झालेल्या गाळपावरील उर्वरित रक्कम प्रती टन चार रुपये ही हंगाम २०२३-२४ संपल्यानंतर १५ एप्रिल २०२४ पर्यंत भरणा करावी.

गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये झालेल्या गाळपावरील रुपये १० प्रतिटनापैकी पाच रुपये निधीची रक्कम ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत व उर्वरित पाच रुपये रक्कम ही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भरणा करण्यासंदर्भात सूचना वेळावेळी दिल्या आहेत.

आता २०२१-२२ मधील देय रक्कम दिली नाही तर गाळप परवाना दिला जाणार नाही, असेही पत्रात नमुद केले आहे. ही कार्यवाही २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार त्वरित करावी, असे खेमनार यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT