Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : ‘जायकवाडी’त पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

Jayakwadi Water Update : ‘‘जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,’’ अशी माहिती मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी दिली.

Team Agrowon

Sambhajinagar News : ‘‘जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,’’ अशी माहिती मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी दिली.

श्री. शिवपुरे यांच्या माहितीनुसार, जायकवाडीत ऊर्ध्व धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, या करिता मुंबई उच्च न्यायालयात राजाभाऊ तुंगार सहकारी उपसा सिंचन संस्था मर्यादित नाशिक तर्फे याचिका दाखल करण्यात आली होती. संबंधित याचिकेवर मंगळवारी (ता. ७) बेंच क्रमांक ५२ मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्याकडे सुनावणी झाली.

त्यामध्ये याचिकाकर्त्यातर्फे अॅड. मनीष केळकर यांनी तर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातर्फे ॲड. अभिनंदन वैगयानी, अॅड. चित्राली देशमुख तर जनता विकास परिषद व मराठवाडा पाणी परिषदेतर्फे ॲड. यशोदीप देशमुख यांनी बाजू मांडली. या वेळी नरहरी शिवपुरे, जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, डॉ. जयसिंग हिरे, धोंडिराम कासले उपस्थित होते. पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी होईल.

‘आता पाणी सोडावे’

श्री. शिवपुरे म्हणाले, ‘‘विजय नेहमी सत्याचाच होतो. मराठवाड्यातील जनतेचे सर्व लक्ष न्यायालयाच्या सोमवारच्या सुनावणीकडे होते. न्यायालयाने जायकवाडीत ऊर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्यास प्रतिबंध केलेला नाही. आता प्रशासनाने त्वरित जायकवाडीत पाणी सोडण्याची कार्यवाही करावी. अन्यथा मराठवाडा पाणी परिषदेत परिषदेतर्फे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे कलम २६ चे उल्लंघन केल्याबाबत दाद मागावी लागेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT