Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : जंगलातील दुर्लक्षित पाणवठ्याची ग्रामस्थांनी केली साफसफाई

Team Agrowon


Water Conservation : रत्नागिरी : उन्हाचा कडाका वाढत असतानाच जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट वाढले आहे. मनुष्य वस्ती नव्हेच तर जंगल भागातील पाणी साठेही कोरडे पडले आहेत. मात्र किरबेट येथील ग्रामस्थ वन्य प्राणी, पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी एकवटले. जंगलामध्ये असलेल्या दुर्लक्षित पाणवठ्याची ग्रामस्थांनी स्वच्छता केली आहे. यामुळे वन्य प्राण्यांच्या बरोबरीने या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाण्याची सुविधा झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडी पासून दोन किलोमीटर अंतरावर गाणी नावाचा पाण्याचा डोह आहे. या ठिकाणचे पाणी कधीही आटत नाही म्हणून येथील ग्रामस्थ आणि शेतकरी पूर्वीपासूनच डोहाची साफसफाई करत असत; त्यामुळे या पाण्याचा वापर शेतकरी तसेच वन्य प्राणी, पक्षी यांना होत असे. परंतु डोंगराळ शेती कमी झाल्याने सुमारे वीस वर्षांपासून या डोहाची साफसफाई झाली नाही. त्यामुळे या डोहामध्ये पालापाचोळा व चिखल साठला होता. त्यामुळे वन्य प्राणी व पक्षी यांना पिण्यासाठी उपलब्ध पाण्याचा स्रोत आटत चालला होता. किरबेट येथील काही ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. हा पाणवठा आपण साफ करू आणि वन्य प्राणी, पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू असा चंग त्यांनी बांधला आणि लोकसहभागातून डोह साफ केला. या डोहामध्ये जाऊन प्राण्यांनी पाणी खराब करू नये मात्र त्यांना पाणी पिता यावे म्हणून डोहामध्ये वरून मोठी लाकडे ठेवण्यात आली. सध्या या डोहामध्ये तीन फूट खोल पाणी आहे.

या मोहिमेमध्ये रामचंद्र रवंदे, अशोक रवंदे, यशवंत जाधव, राजाराम जाधव, शांताराम गाडे, रमेश कोटकर, दत्ताराम गोसावी, जयराम खेतल, सुरेश खेतल, यशवंत कोटकर, श्रीधर सुर्वे, संदीप सुर्वे, अजय सुर्वे, शिवाजी चव्हाण, काशिराम सुर्वे, सुरेश सुर्वे, रमेश निंबाळकर, वसंत सुर्वे, अशोक सुर्वे, राजेंद्र सुर्वे, अनंत सुर्वे, बंटी सुर्वे ,विलास जायगडे, अविनाश सुर्वे, सुरेश अंकुशराव हे ग्रामस्थ सहभागी झाले होते. या उपक्रमाचे गावशिवारामध्ये कौतुक होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT