Union Budget 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला

Budget Session 2024 : देशातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तर यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. याबाबत आता लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करताना तारिख जाहीर केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्रातील मोदी सरकारचे यंदाचे पाच वर्ष पुर्ण होत आहेत. तर येत्या काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी १७ लोकसभेचा हा शेवटचा अर्थसंकल्प कधी होईल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात ही ३१ जानेवारीला होणार असून ते ९ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी (ता. १९ रोजी) माहिती दिली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील असे म्हटलं आहे.

येणारे सरकार सादर करणार अर्थसंकल्प

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जुने नाही तर येणारे सरकार हे अर्थसंकल्प सादर करेल. म्हणजेच एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर येणारे नवीन सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल.

शेवटचा अर्थसंकल्प

सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ हा १६ जून रोजी संपत आहे. म्हणजेच मोदी सरकारचा कार्यकाळ हा जून २०२४ पर्यंतचा आहे. त्यामुळे त्याच्याआधी लोकसभा निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे मोदी सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT