Solapur APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC : टप्पा दुरुस्ती वगळता इतर सर्व मागण्या मान्य

Mathadi Worker Strike : न्यायप्रविष्ट असलेल्या टप्पा दुरुस्ती या मागणी व्यतिरिक्त असलेल्या इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याने बाजार समितीतील माथाडी कामगारांचा दोन दिवसापासून सुरू असलेला बंद मागे घेण्यात आला आहे.

Team Agrowon

Solapur News : न्यायप्रविष्ट असलेल्या टप्पा दुरुस्ती या मागणी व्यतिरिक्त असलेल्या इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याने बाजार समितीतील माथाडी कामगारांचा दोन दिवसापासून सुरू असलेला बंद मागे घेण्यात आला आहे.

बुधवारी या संदर्भात बाजार समिती प्रशासन व माथाडी कामगारांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व भाजीपाला विभागही या संपात सहभागी झाला होता. बुधवारी मात्र फक्त भुसार बाजार बंद ठेवण्यात आला होता.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी टप्पा दुरुस्ती या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे मंगळवारी (ता. १०) बाजार समितीमधील कांदा, भुसार आणि लाल मिरची विभागाचे लिलाव बंद केले होते. मात्र बुधवारपासून भुसार विभाग वगळता इतर विभागाचे लिलाव सुरू करण्यात आले. त्यामुळे कांद्यासह इतर शेतीमालाचा लिलाव करण्यात आले.

माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व संघटनानी एकत्रित येऊन गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने मंगळवारी सर्व संघटनांनी एकत्र येऊन लिलाव बंद ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान पाहून लिलाव बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

त्यामुळे बुधवारी कांदा, लाल मिरची, फळांचे लिलाव झाले. सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीच्या वतीने गेल्या १५ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी बाजार समितीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

यासाठी शिवानंद पुजारी, भीमा सिताफळे, सिद्धाराम हिप्परगी, दत्ता मुरूमकर, गफ्फार चांदा, विशाल मस्के, राजशेखर काळगी, महादेव कोळी, महेंद्र चंदनशिवे, गुरुशांतय्या पुराणिक, शिवानंद जमादार, रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

बुधवारी सकाळी बाजार समितीच्या कार्यालयात बाजार समिती प्रशासन व माथाडी कामगार नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये बाजार समितीच्या अखत्यारीतल्या येणाऱ्या सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला असल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी दिली. यामुळे गुरुवारपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

माथाडी कामगारांच्या टप्पा दुरुस्तीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. तो वगळता माथाडी कामगारांच्या घरकुल, दवाखाना, माथाडी कामगारांची भरती, लिलावानंतर कांदा राखण्याच्या जबाबदारीतून मुक्तता या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाले आहेत. यामुळे गुरुवारपासून बाजार समितीतील व्यवहार सुरळीत सुरू होतील.
- दत्तात्रय सूर्यवंशी, प्रभारी सचिव, सोलापूर बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT