Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Market Committee Update : बाजार समित्यांत सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू

Market Committee Election : खानदेशात बाजार समित्यांची निवडणूक आटोपली. आता सत्तेत आलेल्या मंडळींमध्ये सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon APMC News : खानदेशात बाजार समित्यांची निवडणूक आटोपली. आता सत्तेत आलेल्या मंडळींमध्ये सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. जळगाव, नंदुरबारात नेत्यांसमोर सभापती निवडीची कसोटी आहे. कारण मोठी स्पर्धा सुरू असून, कुणाला संधी द्यावी, हा मुद्दा आहे.

जळगाव बाजार समितीमध्ये ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळविली. सभापतिपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्यात मनोज चौधरी, सुनील महाजन, लक्ष्मण पाटील किंवा कुणबी पाटील किंवा मराठा समाजातील पाडुरंग पाटील किंवा अरुण पाटील यांना संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना लेवा पाटीदार, गुर्जर व कोळी समाजाला जवळ करण्याची संधीही यानिमित्त मिळाली असून, या समाजातील संचालकासदेखील प्रथम एक वर्ष सभापतिपद दिले जाईल, अशीही चर्चा आहे.

यावल (जि. जळगाव) येथील बाजार समितीत लेवा पाटीदार समाजातील संचालकास सभापतिपद मिळू शकते. त्यात गणेश नेहेते यांचे नाव पुढे आहे. बोदवड (जि. जळगाव) येथे कुणबी पाटील समाजातील संचालकास संधी दिली जाईल. कारण तेथे कुणबी पाटील समाजाचे संख्याबळ अधिक आहे.

धुळ्यातील शिरपुरात आमदार अमरिश पटेल हेच सभापतिपदाचा अंतिम निर्णय घेतील. तेथे सभापतिपदी पश्‍चिम भागातून निवडून आलेल्या संचालकास सभापतिपद सुरवातीला मिळेल. दर एक वर्षांनी नव्या सभापतीची नियुक्ती करण्याचा फॉर्म्यूला तेथे तयार झाल्याची माहिती मिळाली.

साक्री बाजार समितीत सर्वपक्षीय बळिराजा पॅनेलमधून लादूसिंग गिरासे किंवा दीपक साळुंके यांना सभापतिपदाची संधी मिळण्याचे संकेत आहेत.

नंदुरबारात कळीचा मुद्दा

नंदुरबार बाजार समितीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्ता कायम राखली आहे. सभापतिपदासाठी अनेक नावे चर्चेत असून, कुणबी पाटील समाजातील संचालकास सभापतिपद मिळू शकते, असे सांगितले जात आहे. विजय पाटील किंवा सुनील पाटील यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT