Wakurde Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Wakurde Yojana : वाकुर्डे योजनेच्या पाण्याची पळवापळवी

Water Issue : काही अनोळखींनी मध्येच व्हॉल्व्ह सुरू करून पाणी दोन तलावांत सोडल्याने ते वेळेत पुढे पोहोचण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.

Team Agrowon

Sangli News : शिराळा व वाळवा तालुक्यातील नागरिक, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वाकुर्डे बुद्रुक योजना सुरू करून वाकुर्डे येथील करमजाई तलावातून पाणी मानकरवाडी येथील बंदिस्त पाइपलाइनच्या माध्यमातून सोडण्यात आले आहे. मात्र, काल रात्री काही अनोळखींनी मध्येच व्हॉल्व्ह सुरू करून पाणी दोन तलावांत सोडल्याने ते वेळेत पुढे पोहोचण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.

शिराळा व वाळवा तालुक्यांतील अनेक ठिकाणची पिके वाळू लागल्याने वाकुर्डे योजनेतून पाणी सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह शिराळा व वाळवा तालुक्यातील नागरिकांनी केली होती. त्या मागणीची दाखल घेऊन जलसंपदा विभागाने वाकुर्डे योजना सुरू केली.

दरम्यान, शनिवारी (ता.३) मध्यरात्री अनोळखींनी निगडी व रेड-बेलदारवाडी, मंगळवारी (ता. ६) दुपारी खेड धनगरवाडा तलावाच्या ठिकाणी व्हॉल्व्ह सुरू करून तलावात पाणी सोडले. त्यामुळे हे पाणी शिवपुरी, सुरूल, कापरी, कार्वे, ढगेवाडी येथे जाण्यास विलंब लागत आहे.

दरम्यान, निम्म्या वाटेतून वाकुर्डे योजनेच्या पाण्याची पळवापळवी सुरू झाल्याने पाटबंधारे अधिकारी हैराण झाले आहेत. त्यामुळे या अडचणींबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रकाश बंडगर, कनिष्ठ अभियंता सचिन आगम यांनी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

पाण्याच्या चोरीचे प्रमाण वाढले

सध्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढू लागल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. त्यामुळे वाकुर्डे योजनेचे पाणी बंदिस्त नलिकेद्वारे सुरू केले आहे. ठरावीक ठिकाणी पाणी सोडण्यासाठी व्हॉल्व्ह ठेवले आहेत. आपल्या पिकाला त्वरित पाणी मिळावे म्हणून काही शेतकरी एकत्रित येऊन रात्री चोरून व्हॉल्व्ह सोडून पाणी आपल्या शेतात अथवा जवळच्या साठवण तलावात सोडतात. त्यामुळे बंदिस्त नलिकेद्वारे पुढे जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होत असल्याने अपेक्षित ठिकाणी वेळेत पाणी पोहोचत नाही. योजना सुरू असताना अशा घटना वारंवार घडत असल्याने अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहेत.

बंदिस्त नलिकेतून पाणी पुढे जात असताना अनोळखींनी विनापरवानगी पाठीमागे व्हॉल्व्ह सुरू केल्याने शिवपुरी, सुरूल व कार्वे, कापरी, ढगेवाडी येथे पाणी पुढे पोहोचण्यास विलंब होत आहे. यापुढे जे कोणी विनापरवाना व्हॉल्व्ह सुरू करतील, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. अशा प्रकारावर नजर ठेवण्यासाठी गस्ती पथक नेमले आहे.

प्रकाश बंडगर, उपअभियंता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladaki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये जमा होणार का?

Nanded Assembly Constituency : नांदेडमध्ये तीन नवख्यांना मिळाली आमदारकीची संधी

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा

Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ; लोकसभेसह राज्यसभेचं कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब

Land Record Registration : गुंता इतर हक्क नोंदीचा

SCROLL FOR NEXT