Lumpy Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजाराचा वाढतोय प्रादुर्भाव

Balasaheb Khilari : मंगरूळ (ता. जुन्नर) परिसरात जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाने यावर तातडीने योग्य उपाययोजना करावी.

Team Agrowon

Belhe News : मंगरूळ (ता. जुन्नर) परिसरात जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाने यावर तातडीने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब खिलारी यांनी केली आहे.

मंगरूळ परिसरात जवळपास तीन हजार पाळीव जनावरे असून, यामध्ये दुभत्या गायींचा समावेश आहे. या आजाराने परिसरात काही जनावरे दगावली आहेत. यामध्ये बैल गाड्याच्या बैलाचाही समावेश आहे.

यामुळे लंपी आजारावर लसीकरण मोहिमेबरोबरच आरोग्यविषयक उपाययोजनेची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. गाय, बैल वर्गीय जनावरांमध्ये या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वेळप्रसंगी परिसरातील जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्यासारख्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बाळासाहेब खिलारी यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT