Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Soybean Crop Insurance : सोयाबीनचा २५ टक्के पीकविम्याचा लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हा लाभ अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याची टीका होत आहे.

Team Agrowon

Buldhana News : मागील खरीप हंगामातील पिकांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सोयाबीनचा २५ टक्के पीकविम्याचा लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हा लाभ अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याची टीका होत आहे.

खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागीलवर्षी मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांची पेरणी केली होती. या पिकांचा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विमा काढला होता. या पिकांचे निसर्गाचे अवकृपेमुळे प्रचंड नुकसान झाले होते.

शेतकऱ्यांनी या पिकावर केलेला खर्चही निघाला नसल्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. या नुकसानीचा पीकविमा कंपनीकडून सर्व्हे करण्यात आला. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा २५ टक्के लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, अनेक शेतकरी या लाभापासून अद्याप वंचित आहेत. तसेच मूग, उडीद या पिकांचा लाभ देण्यास पीकविमा कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आता मात्र, नुकसानभरपाई देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे. याबाबत कोणीही बोलायला तयार नाही.

खरीप हंगामात सोयाबीन पिकांसह इतर पिकांचे नुकसान झाले. विमा काढलेला असताना सुद्धा कंपन्यांकडून व शासनाकडून मदत मिळाली नाही. आम्ही अद्याप प्रतीक्षेत आहोत.
वासुदेव बोहरपी, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT