Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : राज्यातील २६ कारखान्यांची धुराडी अद्याप थंडच

Sugar Crushing Season : गेल्‍या वर्षीच्या अवर्षण स्थितीचा फटका यंदाच्या गळीत हंगामाला बसत आहे. राज्याचा गळीत हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी झाला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : गेल्‍या वर्षीच्या अवर्षण स्थितीचा फटका यंदाच्या गळीत हंगामाला बसत आहे. राज्याचा गळीत हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी झाला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा २६ साखर कारखान्यांची धुराडी अद्याप पेटलेली नाहीत.

हंगाम सुरू न झालेले बहुतांशी साखर कारखाने सोलापूर व अहिल्‍यानगर विभागांतील आहेत. गेल्‍या वर्षी ऊस लागवडीच्या काळात पाणीटंचाई असल्याने याचा परिणाम उसाची लागवड घटण्यावर झाला.

यामुळे काही भागांत उसाची कमतरता आहे. यातच साखरेच्या दराअभावी आर्थिक नियोजन बसत नसल्याने अनेक कारखान्यांना अद्याप यंदाचा हंगाम सुरू करता आला नाही. पहिल्‍या महिन्यात साखर उत्पादनाची साखर उत्पादनाची इतर राज्यांच्या तुलनेत कमी राहिली.

यंदा ११ डिसेंबर अखेर राज्‍यातील १८१ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गेल्‍या वर्षी २०७ कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले होते. ९३ सहकारी, तर ८८ खासगी साखर कारखान्यांनी यंदाचा हंगाम सुरू केला आहे. निवडणुकीच्या धामधुमीमुळे साखर कारखानदारांनी परवाने मिळूनही निकालानंतरच कारखाने सुरू केले.

अनेक कारखान्यांच्या यंत्रणा निवडणुकांत व्यग्र असल्याने बहुतांशी कारखान्‍यांना नियोजन करता आले नाही. कारखान्यांची तोडणीची घडी बसेपर्यंत नोव्हेंबर संपल्याचे काही कारखानदार प्रतिनिधींनी सांगितले.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर विभागात (सोलापूर, धाराशीव) ३९ कारखाने सुरू झाले आहेत. गेल्‍या वर्षी या विभागात ५० कारखाने सुरू होते. सोलापूर विभागात उसाची टंचाई असल्‍याने व प्रामुख्याने खोडवा पिकाचे प्रमाण जास्त असल्याने विभागातील गाळप फार गती घेत नसल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT