Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ऊसदराबाबत सांगलीतील साखर कारखान्यांचे मौन

Sugarcane Season 2024 : यंदाचा सोळा साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. गाळपाची गती वाढू लागली आहे. त्यामुळे पहिली उचल किती मिळणार याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील यंदाचा सोळा साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. गाळपाची गती वाढू लागली आहे. त्यामुळे पहिली उचल किती मिळणार याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मात्र, साखर कारखान्यांनी अद्याप दराबाबतची भूमिका गुलदस्तात ठेवली असल्याचे चित्र आहे. आचारसंहिताही संपली असल्याने कोण पहिल्यांदा दर जाहीर करणार याकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात एक लाख ३७ हजार १०३ हेक्टरवर गाळपासाठी ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील हंगामात १६ कारखान्यांची गाळप हंगाम सुरू केला आहे. या सोळा साखर कारखान्यांनी अंदाजे ३ लाख टनांवर उसाचे गाळप केले आहे. एक-दोन दिवसांत दोन कारखाने सुरू होतील.

अन्य दोन कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी केली आहे. जिल्ह्यात ऊसतोड मजूर निवडणुकीच्या अगोदर म्हणजे १३ नोव्हेंबरपासून दाखल झाले आहेत. साखर कारखान्यांचा गाळप हंगामाला गती येण्यासाठी ऊस तोडणीचे नियोजन कारखाना प्रशासन करू लागला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल ३७०० रुपये द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, विधान सभा निवडणुकीच्या रणधुमाळीत साखर कारखानदार गुंतला होता. त्यामुळे निवडणुका झाल्या, निकाल लागला, आचारसंहिताही संपली. आता स्वभिमानी शेतकरी संघटना ऊस दराबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील साखर कारखानदांरांनी गाळप सुरू करून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली पहिल्या उचलीच्या मागणीबाबत साखर कारखानदारांनी मौन बाळगले आहे.

ऊस पळवापळवीची शक्यता

विधानस‌भा निवडणुकीमुळे ऊस हंगाम उशिरा सुरू करण्याची मागणी साखर कारखान्यांकडून केली होती. निवडणुकीच्या तारखेमुळे हंगाम सुरू होण्यास गोंधळामुळे हा हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला. कर्नाटक सीमा भागातील कारखाने ८ नोव्हेंबरपूर्वीच सुरू झाले आहेत. याचा सांगलीतील कारखान्यांना फटका बसणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cultivation: अमेरिकेत सोयाबीन लागवड वाढणार

Jowar Arrival Increase: अहिल्यानगरला ज्वारीच्या आवकेत वाढ

Krushi Mitra Recruitment Scam: ‘कृषिमित्र’ नावाखाली बोगस भरतीचे पेव

Maharashtra Heatwave: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम

Bordeaux Paste: फळझाडांसाठी बोर्डो पेस्ट घरच्या घरी कसे बनवावे?

SCROLL FOR NEXT