High Temp Agrowon
ॲग्रो विशेष

High Temprature : सूर्याची भट्टी पेटली

Weather News : अकोला येथे हंगामातील उच्चांकी ४५.८ अंश

Team Agrowon

Weather Update : पुणे : सूर्याची भट्टी तापल्याने राज्य भाजून निघत आहे. यातच जगभरात सर्वाधिक तापलेल्या पाकिस्तान आणि राजस्थानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्रात उष्ण लाटेची स्थिती आहे. राज्यात हंगामातील उच्चांकी ४५.८ तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २६) विदर्भातील अकोला आणि चंद्रपूरमध्ये उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
उष्ण झळांनी अंगाची लाही लाही होत असून, उकाड्याने घामटा निघत आहे. शनिवारी (ता. २५) राज्यातील अकोला येथे हंगामातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, ब्रह्मपुरी येथे ४५ अंश तर यवतमाळ, धुळे, वर्धा, वाशीम, अमरावती येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाने काहीशी उघडीप दिल्याचे चित्र असून, उन्हाचा चटका वाढला आहे. आज (ता. २६) विदर्भातील अकोला आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरणार आहे.

शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३७.६, धुळे ४४.४, जळगाव ४५.४, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्वर ३०.१, नाशिक ४२.८, निफाड ३९.९, सांगली ३५.६, सातारा ३६.४, सोलापूर ४०.६, सांताक्रूझ ३४.६, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३३.६, छत्रपती संभाजीनगर ४३.४, नांदेड ४२.८, परभणी ४३.५, अकोला ४५.८, अमरावती ४४.०, भंडारा ४२.३, बुलडाणा ४१.५, ब्रह्मपुरी ४५.०, चंद्रपूर ४३.४, गडचिरोली ४२.८, गोंदिया ४१.८, नागपूर ४२.६, वर्धा ४४.२, वाशीम ४४.२, यवतमाळ ४४.५.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
अकोला, चंद्रपूर.

४४ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
अकोला ४५.८, जळगाव ४५.४, ब्रह्मपुरी ४५, यवतमाळ ४४.५, धुळे ४४.४, वर्धा ४४.२, वाशीम ४४.२, अमरावती ४४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT